सौंदर्याच्या प्री-वेडिंगमधील रजनीकांतचा डान्स व्हायरल

वृत्तसंस्था
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

चेन्नईः दक्षिणेनकडील सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिच्या दुसऱया विवाहापूर्वी प्री वेडिंग पार्टी व संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रजनीकांतसह त्याच्या कुटुंबियाने केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संगीत सोहळ्यावेळी कुटुंबियासह निवडक मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये रजनीकांतची मोठी मुलगी ऐश्वर्या व तिचा नवरा धनुष उपस्थित होते. पार्टीदरम्यान ओरुवन ओरुवन मुधालली... या गाण्यावर रजनीकांतने दमदार डान्स केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सौंदर्याने या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

दरम्यान, सौंदर्याचा हा दुसरा विवाह आहे. सप्टेंबर 2010 मध्ये सौंदयाने उद्योगपती अश्विन रामकुमारसोबत विवाह केला होता. परंतु, दोघांचे न पटल्यामुळे 2016 मध्ये घटस्फोट झाला. मी माझ्या पतीपासून विभक्त झाले आहे, असे सौंदर्याने ट्विट केले होते. सौंदर्याप्रमाणेच तिचा होणारा पती विशगन हा सुद्धा घटस्फोटित आहेत. मॅगझिन एडिटर कनिका कुमारनसोबत त्याचे पहिले लग्न झाले होते. त्याचाही पुढे घटस्फोट झाला. विशगन हा एका औषध कंपनीचा मालक आहे. शिवाय, चित्रपटांमध्येही त्याने भूमिका साकारल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajinikanth takes a plump dance drama on the Soundaryas prewedding party Video viral