राजीव गांधी यांची हत्या, हत्याकांडाचा कट अन् पर्दाफाश...आता सगळंच समोर येणार

देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांच्या १९९१ मध्ये झालेल्या हत्येनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. यावरआधारित वेबसिरीज लवकरच येत आहे.
Rajiv Gandhi Assasination investigation in web series directed by nagesh kukunoor
Rajiv Gandhi Assasination investigation in web series directed by nagesh kukunoorGoogle

Rajiv Gandhi: देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांच्या १९९१ मध्ये झालेल्या हत्येनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. जगभरात वेगानं आपली एक ओळख बनवणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांवर आत्मघातकी हल्ला होणं,अनेकांसाठी विश्वास न बसणारी घटनाच होती. आजही देशाच्या राजकारणात आणि त्याच्याशी जोडलेल्या इतिहासात रस घेणारे लोक आहेत,जे राजीव गांधी यांच्या हत्याकांडाविषयी विचार करुन हैराण होतात.

आता लवकरच तुम्हाला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडावर आधारित वेबसिरीज पहायला मिळणार आहे. अप्लॉज एंटरटेन्मेंटने राजीव गांधी हत्याकांडावर आधारित एका वेबसिरीजची घोषणा केली आहे. ज्या सिरीजचे नाव असणार आहे 'ट्रेल ऑफ एन असैसिन'.(Rajiv Gandhi Assasination investigation in web series directed by nagesh kukunoor)

Rajiv Gandhi Assasination investigation in web series directed by nagesh kukunoor
इतिहासातला सर्वात क्रूर,कपटी,जुलमी,धर्मांध बादशाहा साकारणार यतीन कार्येकर

हा एक क्राइम शो असणार आहे,याची कथा राजीव गांधी हत्याकांडामागचा कट, त्याचा पर्दाफाश आणि आरोपींना झालेली अटक याभोवतीच फिरणार आहे. नागेश कुकुनूर या सिरीजचे दिग्दर्शिन करणार आहे. तर अनिरुध्य मित्राचं पुस्तक 'नाइन्टी डेज: द ट्रू स्टोरी ऑफ द हंट फॉर राजाव गांधीज असैसिन' वर आधारित आहे.

कंटेट स्टुडिओने काही दिवसांपूर्वी प्रोजेक्ट्सची घोषणा केली,ज्यात 'तनाव', 'गांधी औरिस्कॅम २००३' चा समावेश आहे. आता त्यांनी अनिरुद्ध मित्राच्या पुस्तकाचे राइट्स देखील मिळवले आहेत. अनिरुद्ध वरिष्ठ पत्रकार होते. आणि राजीव गांधी हत्याकांडावेळी जो तपास सुरु होता त्यादरम्यान त्यांनी कितीतरी एक्सक्लुसिव्ह बातम्या ब्रेक केल्या होत्या. या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत की कसं सीबीआयच्या स्पेशल इन्वेस्टिगेशन टीमनं हत्येच्या कटाचा पर्दाफाश केला, हत्या करणाऱ्या आरोपींना ओळखलं आणि मास्टरमाइंडला त्याच्या योग्य ठिकाणी पोहोचवलं.

Rajiv Gandhi Assasination investigation in web series directed by nagesh kukunoor
अवधूतचं गाणं म्हणजे टाळ्या-शिट्टयांची बरसात, 'बॉईज' मधलं 'चांद माथ्यावरी' ऐकलंत?

दोन राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरलेला दिग्दर्शक नागेश कुकुनूरने याआधी 'सिटी ऑफ ड्रिम्स' साठी अप्लॉज एंटरेटेनमेंटसोबत हातमिळवणी केली होती,या सीरिजलाही प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. नागेशने याआधी 'इकबाल' आणि 'डोर' सारखे सिनेमे बनवले आहेत.

अप्लॉज एंटरटेन्मेंटचे सीईओ समीर नायर यांनी या शोविषयी बोलताना सांगितले की, ''बऱ्याच लोकांना फक्त बातम्यांच्या माध्यमातून राजीव गांधी हत्याकांडाविषयी माहित आहे. पण या सीरिजच्या माध्यमातून भारतीय इतिहासातील सगळ्यात मोठ्या हत्याकांडातील अंतर्गत गोष्टी पाहता येणार आहेत. मनाला सुन्न करणाऱ्या या कथेला आजच्या प्रेक्षकापर्यंत पोहचवण्यासाठी नागेश कुकुनुर सारखा दिग्दर्शकआम्हाला लाभला याचा आम्हाला आनंद आहे''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com