राजकुमार राव म्हणतोय 'जजमेंटल है क्या?'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

राजकुमार राव आणि कंगना राणावत यांच्या आगामी  'जजमेंटल है क्या' या चित्रपटाची चर्चा सर्वत्र चालू असतानाच ब्रटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन (बीबीएफसी) द्वारे 15 वे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

राजकुमार राव आणि कंगना राणावत यांच्या आगामी  'जजमेंटल है क्या' या चित्रपटाची चर्चा सर्वत्र चालू असतानाच ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन (बीबीएफसी) द्वारे चित्रपटाला 15 वे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ज्यानुसार हा चित्रपट पंधरा वर्षां खालच्या मुलांना बघता येणार नाही. या चित्रपटामधील 'धोका, हिंसा आणि इजा यांचे तपशील ' 15 पेक्षा कमी वयाच्या मुलांनी पहाण्या सारखे नाहीत असे ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशनने स्पष्ट केले. याची घोषणा बीबीएफसी आपल्या ट्वीटर अकाउंट वरू केली आहे.

जजमेंटल है क्या या चित्रपटाच्या ट्रेलरने धुमाकूळ घातला असताना, त्याच्या मोशन पोस्टरने प्रेक्शकांची उत्सुक्सा शिखराला नेऊन ठेवली आहे. 26 जुलैला सिनेमा प्रदर्शित होणार असुन बॅक्स अॅफिस वर हा चित्रपट कसा जज होतो हे बघण्यासारख आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajkumar Rao upcoming film Judgemental Hai kya