राजकुमारचा लखनवी अंदाज 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार राव सध्या लखनऊमध्ये आगामी चित्रपट "बहन होगी तेरी'चं चित्रीकरण करतोय. त्याला लखनवी बोलायला खूप आवडतं. त्यामुळे लखनऊ भाषेचा लहेजा व उच्चार नीट येण्यासाठी त्याने लखनवी भाषेचं प्रशिक्षण घेतलं आहे. लखनऊमध्ये शूटिंग करण्याची राजकुमारची ही दुसरी वेळ आहे. त्याच्या "बरेली की बर्फी' या चित्रपटाचं चित्रीकरणही इथेच झालं आहे. तसेच लवकरच तो अनुभव सिन्हा यांच्या पत्नी रत्ना सिन्हा यांच्या सिनेमाचं शूटिंगही इथेच करणार आहे. लखनवी भाषेबद्दल तो सांगतो की, "लखनऊ बोली भाषा खूपच सुंदर आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार राव सध्या लखनऊमध्ये आगामी चित्रपट "बहन होगी तेरी'चं चित्रीकरण करतोय. त्याला लखनवी बोलायला खूप आवडतं. त्यामुळे लखनऊ भाषेचा लहेजा व उच्चार नीट येण्यासाठी त्याने लखनवी भाषेचं प्रशिक्षण घेतलं आहे. लखनऊमध्ये शूटिंग करण्याची राजकुमारची ही दुसरी वेळ आहे. त्याच्या "बरेली की बर्फी' या चित्रपटाचं चित्रीकरणही इथेच झालं आहे. तसेच लवकरच तो अनुभव सिन्हा यांच्या पत्नी रत्ना सिन्हा यांच्या सिनेमाचं शूटिंगही इथेच करणार आहे. लखनवी भाषेबद्दल तो सांगतो की, "लखनऊ बोली भाषा खूपच सुंदर आहे. त्याला बरेली की बर्फीच्या चित्रीकरणावेळी भाषेचं प्रशिक्षण रोहित चौधरी यांनी दिलं. त्यांनीही या चित्रपटात एक रोल केलाय. त्यानंतर आता "बहन होगी तेरी'चं चित्रीकरण होत असल्यामुळे आता मला लखनवी भाषा चांगल्या प्रकारे बोलता येतेय. तसेही माझ्याकडे यूपीच्या पार्श्‍वभूमी असलेल्या स्क्रीप्ट जास्त येतात.' त्यामुळे माझं लखनवी भाषाप्रेम वाढतंय. 

Web Title: Rajkummar Rao bahan hogi teri lakhnau Andaj