राजकुमार रावच्या वडिलांचं 60 व्या वर्षी निधन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

बॉलिवुडचा अभिनेता राजकुमार राव याच्या वडिलांचं निधन झाले. सत्पाल यादव असं त्यांचं नाव असून ते 60 वर्षांचे होते.

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता राजकुमार राव याच्या वडिलांचं निधन झाले आहे. सत्यपाल यादव असं त्यांचं नाव असून ते 60 वर्षांचे होते. गुडगावमधील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना 17 दिवसांपासून भरती करण्यात आलं होतं. काल म्हणजे गुरुवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सत्यपाल यादव महसूल विभागात सरकारी नोकरीमध्ये कार्यरत होते. 
राजकुमार 2017 मध्ये 'न्यूटन' या चित्रपटाचं शुटींग करत असताना त्याच्या आईचं निधन झालं. आईच्या निधनानंतरही तो दुसऱ्या दिवशी शुटींगसाठी कामावर हजर होता. 

सुरुवातीच्या काळात छोट्या भुमिकांमधून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर स्त्री, बरेली की बर्फी, क्वीन, काई पो छे असे सुपरहिच चित्रपट त्याने केले आणि बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. राजकुमार मुळचा गुडगावचा आहे त्यामुळे त्याच्या वडिलांवर अंत्यसंस्कार तिथेच होत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajkummar Rao's father Satyapal Yadav dies at 60 in Gurugram