Thalaivar 169 ची मेगा घोषणा, रजनीकांतच्या स्वॅगने लुटले सर्वांचे लक्ष |Thalaivar 169 news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajnikanth

Thalaivar 169 ची मेगा घोषणा, रजनीकांतच्या स्वॅगने लुटले सर्वांचे लक्ष

रजनीकांतच्या पुढच्या थलायवर 169 (Thalaivar 169) ची घोषणा झाली आहे. तमिळ (South Industry) सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांच्या पुढच्या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. सन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या थलैवा रजनीकांतच्या १६९व्या चित्रपटाची आज मोठी घोषणा करण्यात आली आहे.

निर्मात्यांनी एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपट दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार (Nelson Dilip Kumar) संगीतकार अनिरुद्धसोबत (Anirudh) काळ्या कोट-पँटमध्ये स्टायलिश पोज देताना दिसत आहेत. तर, तमिळ सुपरस्टार रजनीकांत नेहमीप्रमाणे आपल्या स्वॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सुपरस्टार रजनीकांत यांचा मागील चित्रपट गेल्या दिवाळीला प्रदर्शित झाला होता. रजनीकांत स्टारर चित्रपट अन्नाते देखील सन पिक्चर्सच्याच बॅनरखाली बनवला गेला. या चित्रपटात रजनीकांत सोबत नयनतारा (Nayantara) मुख्य भूमिकेत दिसली होती. तर कीर्ती सुरेशने चित्रपटात रजनीकांतच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. या चित्रपटाला समीक्षकांनी फारशी दाद दिली नाही. असे असूनही, थलायवाच्या चाहत्यांनी चित्रपटगृहात या चित्रपटाचे जोरदार स्वागत केले. तेव्हापासून रजनीकांतच्या पुढील चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. आता अखेर चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली असून रजनीकांत यांच्या पुढील चित्रपटाची मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Web Title: Rajnikanth Thalaivar169 Announcement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..