Urfi Javed : उर्फी जावेदचा स्क्रीनशॉट शेअर करत ब्लॅकमेलिंगचा दावा; इसमाने केली व्हिडिओ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed Latest News

Urfi Javed : उर्फीचा स्क्रीनशॉट शेअर करत ब्लॅकमेलिंगचा दावा; इसमाने केली व्हिडिओ...

Urfi Javed Latest News उर्फी जावेदने स्वतःचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट न करता एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ‘एक व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून त्रास देत आहे. फोटोंशी छेडछाड करून ब्लॅकमेल करीत होता. त्या व्यक्तीने व्हिडिओ सेक्ससाठी विचारले’, असे दावा उर्फीने (Urfi Javed) पोस्टमधून केला आहे. पोलिस (Police) ठाण्यात गुन्हाही दाखल केला होता. मात्र, दोन आठवडे उलटूनही कोणतीही कारवाई झाली नाही, असेही उर्फीने लिहिले आहे.

कोणीतरी माझ्या फोटोशी छेडछाड करून शेअर करायला सुरुवात केली. मी त्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली होती. मी खूप वाईट काळातून गेली होते. मी एक पोस्ट केली होती जी अजूनही माझ्या प्रोफाइलवर आहे. त्या बदल्यात हा माणूस मला व्हिडिओ सेक्स करण्यासाठी ब्लॅकमेल करीत होता, असेही उर्फीने लिहिले आहे.

अनेक बॉलीवूड पेजेसला ते फोटो देईन आणि करिअर बरबाद करीन असे तो म्हणाला. तो मला सायबर बलात्कारासाठी ब्लॅकमेल करीत होता. तो व्यक्ती पंजाब इंडस्ट्रीमध्ये काम करीत आहे, असेही उर्फीने (Urfi Javed) म्हटले आहे. सोबतच उर्फीने चॅटचा स्क्रीनशॉट आणि त्या व्यक्तीचा फोटोही पोस्ट केला आहे.

हेही वाचा: KRK : केआरकेचा आमिर खानवरून शाहरुख-सलमानवर हल्ला; दिला इशारा

मी पहिल्यांदा गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. या घटनेला १४ दिवस झाले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मी खूप निराश झाली आहे. मुंबई पोलिसांबद्दल (Police) अनेक चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्या. परंतु, त्यांचा या माणसाबद्दलचा दृष्टिकोन विचित्र आहे. त्याने किती महिलांशी हे कृत्य केले हे सांगूनही कारवाई झाली नाही, असेही उर्फी जावेद म्हणाली.

हा माणूस समाजासाठी, स्त्रियांसाठी धोक्याचा

हा माणूस समाजासाठी, स्त्रियांसाठी धोक्याचा आहे. त्याला मोकळेपणाने जगू देऊ नका. पोलिस आता काय कारवाई करतील हे मला माहीत नाही. परंतु, मला या माणसाबद्दल सर्वांना सांगायचे होते की तो अजूनही पंजाब इंडस्ट्रीत मोकळेपणाने काम करतो आहे, असेही उर्फी जावेद म्हणाली.

Web Title: Urfi Javed Social Media Photo Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..