राजू श्रीवास्तव यांच्या मॅनेजरने दिली मोठी अपडेट.. ब्रेन डेड नव्हे तर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Srivastava health update

राजू श्रीवास्तव यांच्या मॅनेजरने दिली मोठी अपडेट.. ब्रेन डेड नव्हे तर..

Raju Srivastava health update: सध्या संपूर्ण भारत देश प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे. कारण त्यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाही. 10 ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकारचा झटका आला. तेव्हापासून ते दिल्लीतील AIIMS रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता आठ दिवस उलटून गेले तरी अद्याप ते शुद्धीवर आलेले नाहीत. सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. कधी ते गंभीर असल्याची वार्ता येते तर कधी ते बरे होत असल्याची. आताच एक मोठी अपडेट हाती आली आहे. राजू श्रीवास्तव यांच्या मॅनेजरने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले आहे. (Raju Srivastava health update: Comedian suffered brain damage after heart attack, still on ventilator)

राजू श्रीवास्तव यांचे ब्रेन डेड झाल्याची गंभीर बातमी काल समोर आली होती. त्यावरून बऱ्याच चर्चाही रंगल्या होत्या. काहींनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले होते. पण नेमकी स्थिती काय आहे याबाबत राजू यांच्या मॅनेजरने माहिती दिली आहे,

राजू श्रीवास्तव यांचे मॅनेजर राजेश शर्मा यांनी एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, 'कालच्या तुलनेत आज त्यांची प्रकृती थोडी सुधारली आहे.आता काही सकारात्मक गोष्टी दिसून येत आहेत. त्यांचे सर्व अवयव व्यवस्थित काम करत आहेत. इंजेक्शन आणि औषधांमुळे त्यांच्या ब्रेनवर सूज आली होती. परंतु त्यांचा ब्रेन डेड झालेला नाहीय. ते सध्या सेमी कोमाच्या स्टेजवर आहेत. यामध्ये जे नवीन डॉक्टर सहभागी झाले आहेत. ते सर्व प्रयत्न करत आहेत. त्यामुळे काही सकारात्मक गोष्टी नक्कीच घडतील अशी आशा आहे. परंतु कोणीही कसलीही अफवा पसरवू नका आणि त्यावर विश्वास ठेवू नका,'असे त्यांनी सांगितले आहे.

राजू श्रीवास्तव १० ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करत होते. जिममध्ये वर्कआऊट करताना श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनंतर त्यांची एन्जॉग्राफी आणि एन्जॉप्लास्टी करण्यात आली. परंतु तब्येतीत फारशी सुधारणा न झाल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांचे संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे.

Web Title: Raju Srivastava Health Update His Manager Said Brain In Non Dead He Response Positively

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..