Raju Srivastava Health Update : राजूला अद्याप शुद्ध आलेली नाही; मुलगी म्हणाली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Srivastav Health Update News

Raju Srivastava Health Update : राजूला अद्याप शुद्ध आलेली नाही; मुलगी म्हणाली...

Raju Srivastav Health Update News राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) लवकर बरा व्हावा यासाठी कुटुंबीय आणि चाहते झटत आहेत. राजू दोन आठवड्यांहून अधिक काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहेत. १० ऑगस्ट रोजी दिल्लीतील हॉटेलच्या जिममध्ये व्यायाम करताना राजूची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला एम्समध्ये दाखल केले. तेव्हापासून आजपर्यंत राजू व्हेंटिलेटरवर आहे. नुकतीच बातमी आली की राजू शुद्धीवर आला आहे. त्यामुळे चाहत्यांना आनंद झाला. परंतु, राजूच्या मुलीने सोशल मीडियावर विधान शेअर केले आणि सांगितले की, राजू अद्यापही व्हेंटिलेटरवर आहे. तसेच राजूच्या भाच्याने शुद्धीवर आल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.

सर्व हितचिंतकांनो, माझे वडील राजू श्रीवास्तव यांची प्रकृती आता ठीक आहे. ते हळूहळू बरे होत आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. तुम्हाला फक्त एम्स दिल्ली आणि राजू यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरच योग्य माहिती मिळेल. इतरांच्या बातम्या आणि विधाने कितीही असली तरी सर्व बरोबर असणार नाहीत, असे राजूच्या मुलीने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे.

डॉक्टर आणि दिल्ली एम्सची टीम खूप मेहनत घेत आहे. आम्ही त्यांचे आणि राजूजींच्या शुभचिंतकांचे आभारी आहोत. आपणा सर्वांना विनंती आहे की आपले प्रेम असेच ठेवा आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करीत राहा, असे राजूच्या मुलीने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे.

दुसरीकडे राजूचा (Raju Srivastava) पुतण्या कुशल श्रीवास्तवने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, राजूजींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, ते शुद्धीवर आल्याची बातमी खरी नाही. त्यांनी अनेकवेळा डोळे उघडले आणि हात हलवले. परंतु, ते आमच्यासाठी पुरेसे नाही. त्यांना बरे झालेले पाहायचे आहे. त्यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्यांना बरे होण्यास वेळ लागेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे निधन; १९ हून अधिक चित्रपटांची निर्मिती

राजू अजूनही व्हेंटिलेटरवर आहे. डॉक्टरांना त्यांना तेथून बाहेर काढायचे आहे. मात्र, सध्या अशी कोणतीही योजना नाही. डॉक्टरांना त्यांची तब्येत अजून सुधारायची आहे, असेही कुशल पुढे म्हणाला. राजू शुद्धीवर आल्याची बातमी स्वीय सचिव गरवित यांनी दिली होती. यावर राजूचा दुसरा पुतण्या मयंक श्रीवास्तवने सांगितले की, राजू शुद्धीवर आलेले नाही. आम्ही सध्या रुग्णालयात आहोत. त्यामुळे तुम्ही आमचे म्हणणे ऐकावे.

Web Title: Raju Srivastava Health Update Ventilator

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :updateComedianhealth