राकेश रोशन यांना घशाचा कर्करोग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांना घशाचा कर्करोग झाल्याचे उघड झाले आहे, त्यांचा मुलगा हृतिक रोशननेच इन्स्टाग्रामवरून ही माहिती जाहीर केली. राकेश रोशन यांचा कर्करोग हा प्राथमिक टप्प्यात असून सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हृतिकच्या पोस्टची दखल घेत राकेश रोशन यांनी या आजारातून तत्काळ बरे व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. राकेश रोशन हे लढवय्ये असून ते या आव्हानाला देखील मोठ्या धैर्याने सामोरे जातील, असा विश्‍वास मोदींनी व्यक्त केला.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rakesh Roshan throat cancer