राखी नडली, शर्लिननं थेट जेलमध्ये धाडली! नेमकं काय आहे प्रकरण? | Rakhi Sawant Arrest | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Sawant Arrest

Rakhi Sawant Arrest : राखी नडली, शर्लिननं थेट जेलमध्ये धाडली! नेमकं काय आहे प्रकरण?

Rakhi Sawant Arrest : बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतला आता मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तिचा आणि शर्लिनमधील वाद टोकाला गेला आहे. शर्लिननं तर काहीही झालं तरी आपण तिला सोडणार नाही. असा पवित्रा घेतला आहे. या दोन्ही सेलिब्रेटींच्या भांडणाचे नेमके कारण नेमकं आहे तरी काय...

राखीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर शर्लिननं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिसांना एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये शर्लिननं साजिद खानच्या विरोधात विनयभंगाचे जे आरोप केले होते त्याचा उल्लेख केला आहे. अद्याप त्या प्रकरणाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. असेही शर्लिननं म्हटलं आहे.

Also Read - शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

दुसरीकडे राखी सावंतनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शर्लिनच्या विरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये बदनामी केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. सध्या राखी ही पोलीस कोठडीमध्ये असून आता राखी आणि शर्लिनची भांडणं किती दिवस चालणार हा त्यांच्या चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय आहे.

हेही वाचा: Jaya Jaya Jaya Jaya Hey Review : बायको जयासारखी असेल तर मग 'दवाखाना' जवळ हवाच!

प्रकरण आहे तरी काय...

बिग बॉसचा १६ सीझन सुरु झाला तसे त्या शो मधील प्रसिद्ध स्पर्धक साजिद खानवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप शर्लिन चोप्रानं केले होते. काही झालं तरी त्या शो मध्ये साजिदला घेऊ नका. अशी भूमिका शर्लिनची होती. ज्या माणसानं महिलांचे शोषण केले आहे, त्यांच्याशी गैरवर्तन केले आहे त्याला माफी नाही. त्याला बिग बॉसमधून बाहेर काढण्यात यावे. असे शर्लिनचे म्हणणे होते.

हेही वाचा: Trial By Fire Web Serise Review : काळजावर हात ठेवून पाहावी लागेल 'ट्रायल बाय फायर'!

यावर शर्लिनने साजिद खानच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढाकार घेतला. ती पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देऊन बाहेर पडल्यानंतर राखीनं जाऊन शर्लिनच्याविरोधात तक्रार दिली. तसेच बाहेर असलेल्या प्रेसशी तिनं संवाद साधत शर्लिनवर जे नाही ते आरोप केले, तिच्याविषयी अश्लील शब्द वापरल्याचे शर्लिनचे म्हणणे आहे. ते ऐकल्यानंतर शर्लिनला राग आला आमि तिनं राखीच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली होती.

पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर शर्लिननं एक ट्विट केले आहे. त्यामध्ये तिनं म्हटलं आहे की, कलम ४९९, ५००, ५०९ आणि ५०३ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शर्लिननं जुहू पोलीस ठाण्यामध्ये तिनं ही तक्रार दाखल केली असून आता नौटंकीबाज राखीनं पुढील कारवाईसाठी तयार राहावे. असे म्हटले आहे.

हेही वाचा: Kuttey Review : 'कुत्ते' पाहिल्यावर तोंडातून शिव्याच बाहेर पडणार! नुसताच...

एका वृत्त वाहिनीशी बोलताना शर्लिननं म्हटलं आहे की, गेल्या वर्षी मी नोव्हेंबरमध्ये राखीच्या विरोधात तक्रार दिली होती. तिला माझ्या प्रकरणात लक्ष घालण्याचे काहीही कारण नव्हते. माझी आणि साजिद खान, राज कुंद्राची भांडणं होती तर त्यामध्ये राखीचा बोलण्याच संबंध काय, ती मला वेश्या म्हणाली होती... त्यामुळे मला तिच्याबाबत कडक कारवाई करायचीच होती. म्हणून मी बदनामीची केस फाईल केली.