Rakhi Sawant: 'पहिले माझे घरचे, मग तुझे कपडे...' बॉयफ्रेंड आदिलनं सांगून टाकलं| boyfriend Adil khan viral video comment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Sawant news

Rakhi Sawant: 'पहिले माझे घरचे, मग तुझे कपडे...' बॉयफ्रेंड आदिलनं सांगून टाकलं

Rakhi Sawant And Adil Khan: टीव्ही मनोरंजन विश्वातील मोठी सेलिब्रेटी म्हणून राखीचं नाव नेहमीच घेतलं जातं. ती एक तऱ्हेवाईक सेलिब्रेटी आहे. चर्चेत राहण्यासाठी ती कधी काय करेल याचा भरवसा नाही. गेल्या बिग बॉसच्या (Tv Entertainment news) सीझनमध्ये कुणा एकाला आपला पती म्हणून ती घेऊन आली होती. त्यामुळे ती चर्चेत आली. सलमाननं देखील तिला तो तुझा खरोखरचा पती आहे का असे विचारुन खात्री करुन घेतली होती. राखीनं त्या सीझनमध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. तिच्यामुळे तो शो बराचसा चर्चेत आला होता. आता राखीच्या बॉयफ्रेंडनं आदिलनं एका व्हिडिओमध्ये राखीला काही गोष्टींबाबत सक्त ताकीद दिल्याचे दिसून आले आहे.

त्याचं झालं असं की, या दोन्ही सेलिब्रेटींना पापाराझ्झींनी बोलतं केलं. राखीचं नवं गाणं सध्या सोशल मीडियावर आलं आहे. त्याला तिच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. यानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये राखीच्या बॉयफ्रेंडनं तिला कपड्यांबाबत एक सल्ला दिला होता. त्यानं त्याविषयी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर वक्तव्य केल्यानं तो चर्चेत आला आहे. मी नेहमीच माझ्या कुटूंबियांचा विचार केला आहे. त्यांना काय वाटते हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. राखी जेव्हा माझ्या कुटूंबाचा भाग होईल तेव्हा मी कपड्यांवरुन तिला काही गोष्टींची मर्यादा आखून दिली आहे. याचा अर्थ मी तिच्यावर कपड्यांबाबत सक्ती करतो आहे असे नाही.

हल्ली राखी बोल्ड कपड्यांमध्ये का दिसत नाही यावरुन तिला एकानं प्रश्न विचारला होता. त्यावर तिच्या बॉयफ्रेंडनं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. मी राखीला अद्याप हिजाब घालण्यासाठी आग्रह केलेला नाही. मात्र घरात असताना कप़ड्यांबाबत तिनं योग्य ती काळजी घ्यावी. असं माझं म्हणणं आहे. असे आदिलनं पापाराझ्झींना सांगितले आहे. सोशल मीडियावर या प्रेस मीटचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी ज्या धर्मातून आलो आहे त्याचे नियम आणि अटी याचे पालन मला केले पाहिजे. त्याचा आदर करायला हवा. असे मला वाटते.

हेही वाचा: Bramhastra: सुशांतचं 'ब्रम्हास्र' बॉलीवूडला करेल भस्म, बहिण मीतूची जळजळीत प्रतिक्रिया

आदिल आणि राखी हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. त्यांच्या रिलेशनशिपविषयी वेगवेगळ्या चर्चेला उधाणही आले आहे. राखी ही नेहमीच तिच्या रिलेशनशिपवरुन वादाच्या भोवऱ्यात सापडलेली सेलिब्रेटी आहे.

Web Title: Rakhi Sawant Bollywood Celebrity Boyfriend Adil Khan Wear Clothes Viral Video Comment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..