
Rakhi Sawant: 'त्याचं याआधीही लग्न झालयं...',राखीनंतर तिच्या भावाचे गंभीर आरोप तर आदिल न्यायालयात हजर
राखी सावंत नुकतीच मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राखी सावंतचा पती आदिल दुर्राणी याला ओशिवरा पोलिसांनी ७ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. दरम्यान त्याला रिमांडसाठी अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. आता पुढिल चौकशी सुरु आहे.
दरम्यान राखीचा भाऊ राकेश सावंत यानेही आदिलवर गंभीर आरोप केले होते. याआधीही मीडियाशी बोलताना राकेश यांनी सांगितलं होतं की, आदिल राखीला खुप मारहाण करायचा. तो तिला शिवीगाळ करायचा. त्याचबरोबर त्याने राखीकडून पैसेही घेतले आहेत. असे अनेक आरोप त्याने राखीवर लावले आहेत.
दरम्यान आज पुन्हा मिडियाशी बोलतांना त्याने सांगितलं की, आता मिळालेली माहिती राखीसाठी खुप धक्कादायक आहे. त्याचे याआधीही लग्न झालेले आहे. आदिल चिटर आहे. तो चोर आहे. या प्रकरणानंतर राखीला अनेक मुलींचे फोन आले आहेत. त्यांनीही सांगितले की आदिलने त्यांना मारुन टाकण्याची धमकी दिली होती. आता राखी मागे हटणार नाही.
राखी सावंत अनेक दिवसांपासून पती आदिलवर फसवणूक केल्याचा आरोप करत आहे. नंतर राखीने त्या मुलीचा चेहराही सर्वांना दाखवला. पण नुकतेच राखीच्या नव्या वक्तव्याने लोकांना हादरवून सोडले. आदिलने आपला विश्वासघात केल्याचा आरोप तो करतो. आदिलने त्या मुलीशी ३ वर्षांपूर्वी लग्न केले असून तो तिची फसवणूक करत असल्याचे त्याने सांगितले.
आता धक्कादायक बाब म्हणजे राखीने आदिलवर मारहाण केल्याचा आणि तिच्या पैशांची आणि दागिन्यांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. आता राखीच्या भावानेही तिच्यासोबत झालेल्या भांडणाचे पुरावे दाखवले आहेत.