राखी सावंतचा नवरा येणार 'बिग बॉस १५'मध्ये | Rakhi Sawant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress rakhi sawant

राखी सावंतचा नवरा येणार 'बिग बॉस १५'मध्ये

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Bigg Boss 15 'बिग बॉस १४' नंतर आता 'बिग बॉस १५'मध्येही 'ड्रामा क्वीन' राखी सावंतची Rakhi Sawant एण्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे या राखीसोबत तिचा पती रितेशसुद्धा बिग बॉसच्या घरात येणार आहे. राखीच्या लग्नानंतर तिचा पती कधीच माध्यमांसमोर आला नाही. त्यामुळे आता रितेश म्हणून कोण कॅमेरासमोर येणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. "अर्थात, माझं लग्न झालं आहे आणि अखेर हे जग माझ्या पतीला पाहणार आहे. बिग बॉसच्या घरात मी रितेशसोबत एण्ट्री करणार आहे", असं राखी म्हणाली.

बिग बॉसच्या पहिल्या सिझनमध्येही राखीने हजेरी लावली होती. बिग बॉस १४ मध्ये तिने वाईल्ड कार्ड एण्ट्री केली. अंतिम फेरीपर्यंत ती घरात टिकून राहिली. मात्र ऐनवेळी तिने १४ लाख रुपये स्वीकारत अंतिम फेरीतून माघार घेतली. आईच्या उपचाराकरिता पैशांची गरज असल्याचं तिने सांगितलं होतं. मात्र यावेळी बिग बॉसची ट्रॉफी जिंकूनच येणार, असा निर्धार तिने केला आहे. "मी ट्रॉफीवर लटकेन पण ती घरी नक्की आणेन. साम, दाम, दंड, भेद सगळं करेन आणि यावेळी जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेन", असं ती पुढे म्हणाली.

हेही वाचा: सलमानचा मेहुणा पुण्याच्या रस्त्यावर धावला ३३ किमी; जाणून घ्या कारण..

राखीने स्वत:च्या लग्नाची अफवा पसरवल्याचा तिच्यावर आरोप झाला. या आरोपांवर उत्तर देत ती म्हणाली, "रितेश या व्यावसायिकासोबत मी लग्न केलंय असं सांगितलं तेव्हा लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी खोटारडी आहे आणि प्रसिद्धीसाठी अशी वागतेय, असं ते म्हणाले. माझ्याकडे कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ नव्हते म्हणून ते माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते. मी माझ्या लग्नालाही कोणाला आमंत्रित केलं नव्हतं. पण आता बिग बॉसमध्ये जेव्हा ही लोकं रितेशला पाहतील तेव्हा त्यांच्या शंका दूर होतील. माझ्या खातर त्याने बिग बॉसमध्ये येण्यास होकार दिला. तो खूप प्रेमळ आहे."

loading image
go to top