'हा घ्या आमच्या हनीमुनचा व्हिडिओ! राखीच्या नवऱ्यानं दिला पुरावा, आता तरी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Adil Video Viral

Rakhi Adil Video Viral : 'हा घ्या आमच्या हनीमुनचा व्हिडिओ! राखीच्या नवऱ्यानं दिला पुरावा, आता तरी...

Rakhi Sawant Honeymoon Video: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ड्रामा क्वीन म्हणून राखी सावंतकडे पाहिले जाते. गेल्या काही दिवसांपासून राखी ही तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. आता खरचं तिचे लग्न झाले का, तिचा पती कोण आहे, तो काय करतो यावरुन नेटकऱ्यांना, तिच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडले होते. यासगळ्यावर पतीनं वेगळीच माहिती दिली आहे.

राखी यावेळी मराठी बिग बॉसमध्ये होती. गेल्या बिग बॉसच्या हिंदी सीझनप्रमाणे तिनं मराठी बिग बॉसमध्ये पैसे घेऊन शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपण हे सगळे पैसै आईच्या आजारपणासाठी घेतले आहे असे सांगून तिनं लग्नाचा निर्णय सोशल मीडियावर जाहिर केला. त्याचे फोटोही व्हायरल केले.

Also Read - ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

राखीच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच मात्र चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आपण जे ऐकतो आहे ते खरच आहे का, राखीनं तिचा मित्र आदिल दुरानीशी लग्न केलं. हा तोच मित्र ज्याच्या सोबत राखी बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करते आहे. दरम्यान राखीच्या गर्भपाताच्या बातम्याही व्हायरल झाल्या होत्या. यासगळ्यात आदिलनं खुलासा केला आणि त्यावर पडदा पडला.

राखीचं लग्न खरं की खोटं असा प्रश्न चाहत्यांना असून सातत्यानं आमच्या लग्नावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर आदिलनं नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यानं चक्क राखीसोबतच्या हनीमूनचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर राखी आदिलला म्हणते क्या कर रहे हो जान! तो व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे.

हेही वाचा: Rakhi Sawant नंतर आता शर्लिन चोप्रानं टार्गेट केलं सलमान खानला, खिल्ली उडवत म्हणाली...

राखी सावंतच्या त्या व्हिडिओनं मात्र नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. त्याचे झाले असे की, राखी आणि आदिल हे मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. यावेळी पत्रकारांनी आदिलला ते गिफ्ट दाखवण्याचा आग्रह केला जे त्यानं दुबईमध्ये दिले होते. यानंतर आदिलनं त्याच्या फोनमधील व्हिडिओ आणि फोटो दाखवण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

गेल्या वर्षी राखीनं नोव्हेंबरमध्ये तिचा बर्थ डे सेलिब्रेट केला होता. यावेळी आदिलनं तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केले होते. तिला एक मोठी किंमती गिफ्टही दिलं होतं. आदिलचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

हेही वाचा: Trial By Fire Web Serise Review : काळजावर हात ठेवून पाहावी लागेल 'ट्रायल बाय फायर'!