Rakhi Sawant: राखीच्या आईला झालेल्या गंभीर आजाराविषयी जाणून घ्या सविस्तर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rakhi sawant mother jaya bheda suffering from stomach cancer and brain tumor disease

Rakhi Sawant: राखीच्या आईला झालेल्या गंभीर आजाराविषयी जाणून घ्या सविस्तर..

Rakhi Sawant: सध्या राखी सावंत हा चर्चेचा विषय झाली आहे. तिच्या आईचं आजारपण, तिचं लग्न आणि आताची अटक यामुळे ती प्रचंड वादात अडकली आहे. पण ही आजची गोष्ट झाली तरी गेली काही वर्ष राखी सातत्याने तिच्या आईच्या आजारपणाविषई बोलत आली आहे. आज जाणून घेऊया राखीच्या आईला नेमका कोणता आजार आहे.

(rakhi sawant mother jaya bheda suffering from stomach cancer and brain tumor disease nsa95 )

राखीला तिच्या आईशिवाय या जगात कुणीच नाही. त्यामुळे तिचा तिच्या आईवर प्रचंड जीव आहे. जे काही पैसे कामावते ते केवळ तिच्या आईच्या आजारपणासाठी कमावते, असे तिने अनेकदा सांगितले आहे. एवढेच नाही तर बिग बॉस मराठी मध्ये 9 लाख घेऊन तिने खेळ सोडला, तेव्हाही ती म्हणाली मला आईच्या उपचारासाठी पैसे हवे आहेत.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Rakhi sawant: "कोणालाही दुखवण्या आधी दोनदा..." पोलिस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर राखीची पोस्ट चर्चेत

राखीच्या आईचे मूळ नाव जया भेडा. राखीच्या आईने पहिला संसार मोडल्यानंतर सावंत नामक एका पोलिस कॉन्स्टेबलशी लग्न केलं आणि त्या सावंत झाल्या. या आधी त्या राखी सोबत अनेक कार्यक्रमांमध्ये आल्या आहेत. पण गेल्या काही वर्षात त्यांची प्रकृती काही ठीक काही. किंबहुना त्या एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत.

राखीच्या आईला सुरवातीला पोटाचा कर्करोग झाला आणि त्यवर उपचार सुरू असतानाच राखीच्या आईला ब्रेन ट्यूमर हा आजार झाला, ज्यामध्ये मेंदूजवळ गाठ तयार होते. हे दोन्हीही अत्यंत गंभीर आजार आहेत. शिवाय राखीच्या आईचे वय 60 वर्षांहून अधिक असल्याने या आजारांवारील उपचार आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद फारसा सकारात्मक नाही. त्यामुळे सध्या त्या अत्यावस्थ आहेत.

सध्या हा कर्करोग राखीच्या आईच्या संपूर्ण शरीरभर पसरत चालला आहे. त्यांच्या लिव्हर, लंन्स सह मेंदूपर्यंत पोहोचला आहे. शिवाय त्यांना इतर अनेक आजरांनी ग्रासल्याने यावर उपचार होणे कठीण आहे. डॉक्टर प्रयत्न करत असले तरी प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी आधीच सांगितले आहे. त्यामुळे आपल्या आईला वाचवण्यासाठी राखी जीवाचं रान करून पैसे जमवत आहे.

टॅग्स :Rakhi Sawant