राखी सावंत होणार आई? शेअर केला हा खास फोटो

वृत्तसंस्था
Monday, 26 August 2019

यापूर्वी तिने आपण गुपचूप लग्न केले असल्याचे सांगितले होते. तिचा नवरा एनआरआय असून ती हनीमूनला गेल्याचे फोटोही तिने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते.

अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. आधी लग्न, हनीमून मग घटस्फोट यांमुळे चर्चेत आलेली राखी आता अजून एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. राखीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय यामुळे सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय आणि पुन्हा एकदा राखीबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत.

यापूर्वी तिने आपण गुपचूप लग्न केले असल्याचे सांगितले होते. तिचा नवरा एनआरआय असून ती हनीमूनला गेल्याचे फोटोही तिने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. मात्र तिने तिच्या नवऱ्यासोबत एकही फोटो शेअर केला नव्हता. आज तिने सगळ्यांना आश्चर्यचकीत करत एका आईचा व तिने आपल्या बाळाला कुशीत घेतलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमुळे नेटकऱ्यांनी अनेक तर्क लढवत ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज बांधला आहे. तसेच या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

ब्रिटीश अभिनेत्री सोफिया हयात हिनेसुद्धा राखीसाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती राखीला शुभेच्छा देताना दिसत आहे. आता ती खरंच प्रेग्नंट आहे की नाही हे मात्र खुद्द राखीलाच माहीत!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rakhi sawant shares mother and baby s photo on her Instagram account