
Rakhi sawant: 'गोडीत सांग माझे पैसे कुठे ठेवलेस?', राखी आदिलला भेटायला तुरुंगात...
टीव्ही अभिनेत्री राखी सावंतने तिच्या नवऱ्यावर अनेक आरोप केले आहे. सध्या सोशल मिडियावरही तिची बरीच चर्चा आहे. ती पापाराझी यांना तिच्या नवऱ्याबद्दल सांगत असते. आदिल खान दुर्रानी सध्या तुरुंगात आहे. राखीने त्याच्यावर बरेच आरोप केले आहेत. ज्यामध्ये तिच्यावर अत्याचार मारहाण आणि फसवणूकीच्या आरोपांचा सामावेश आहे.
न्यायालयाने आदिल खानला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तिने पुन्हा एकदा मीडियाशी संवाद साधला. ती म्हणाली की ती आदिल खानचं पितळ उघड करणार आहे. लॉकअपमध्ये असलेला आदिल तिच्याशी उद्धटपणे बोलत आहे.
पापाराझींनी राखी सावंतला विचारले की आदिलचे आई-वडील आणि कुटुंबीयांचा म्हैसूरहून फोन किंवा मेसेज आला होता का? यावर राखी सावंत म्हणाली की त्यांना माहित आहे की तिचा मुलगा आदिल खूप सेटिंगबाज माणूस आहे. तो सुटेल. पण हा राखी सावंतचा केस आहे. मी शांत बसणार नाही.
राखी सावंतने पुढे सांगितले की, तिची आदिलसोबत लॉकअपमध्ये भेट झाली होती. मी त्याच्याकडे दीड कोटी रुपये मागितले. अखेर त्यांने एक कोटी 60 लाख रुपये ठेवले कुठे? मी त्याला विचारलं की तू गाडी घेतली आहेस का? यावर तो म्हणतोय, मी तुला कधीच माफ करणार नाही. मी पोलिसांना जाबाब देवू की तुला, असं ते म्हणत आहेत.