Rakhi Sawant: समोर आली आदिल खानची गर्लफ्रेंड, राखीनं केलेल्या आरोपांवर पंतप्रधानांचे उदाहरण देत म्हणाली..

निवेदिता उर्फ तनु चंदेल हिच्यावर आज एका इव्हेंट दरम्यान मीडियानं राखीनं केलेल्या आरोपां संदर्भात प्रश्नांचा भडिमार केला तेव्हा तिला बोलणं भाग पडलं.
Adil Durrani girlfriend nivedita chandel react on rakhi sawant allegations
Adil Durrani girlfriend nivedita chandel react on rakhi sawant allegationsGoogle

Rakhi Sawant & Adil Khan Durrani Case Update: ड्रामा क्वीन राखी सावंतचा नवरा आदिल खान दुर्रानीची गर्लफ्रेंड निवेदिता चंदेलंन आपल्यावर लावल्या गेलेल्या सगळ्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

बुधवारी मुंबईतील एका इव्हेंट दरम्यान पपाराझीनं मॉडेल निवेदिता चंदेलला स्पॉट केलं. त्या इव्हेंटमध्ये निवेदिता आपला म्युझिक व्हिडीओ प्रमोट करायला आली होती. यादरम्यान पापाराझीनं तिच्यावर राखी सावंतशी संबंधित काही प्रश्नांचा भडिमार केला.

चला जाणून घेऊया काय म्हणाली निवेदिता चंदेल.(Adil Khan Durrani girlfriend nivedita chandel react on rakhi sawant allegations)

Adil Durrani girlfriend nivedita chandel react on rakhi sawant allegations
Urfi Javed: 'कपडे सोडून अंगावर सगळं घालते ही..', आता बयेनं अंगावर चिटकवले..

इव्हेंटमध्ये निवेदिताला राखी सावंतनं तिच्यावर केलेल्या आरोपांविषयी विचारले तेव्हा मॉडेलनं म्हटलं की,''मग काय झालं..मोदीं विरोधात देखील अनेक गोष्टी बोलल्या जातात..मग त्या काय खऱ्या असतात का? मला या गोष्टीनं काही फरक पडत नाही की लोक माझ्या बाबतीत काय विचार करतात?''

'' मला माहित आहे की मी काय आहे''.

यानंतर निवदिता म्हणाली,''मला या विषयात पडायचं नाही''. जाता-जाता निवेदितानं हे नक्कीच म्हटलं की,तिनं एक-दोन वेळा राखीशी संवाद साधला होता आणि ती खूप गोड आहे. तिनं आपली बाजू मांडताना हे देखील सांगितलं की, मी तिच्याशी काहीच चुकीचा व्यवहार केलेला नाही.

Adil Durrani girlfriend nivedita chandel react on rakhi sawant allegations
Kartik Aaryan: 'पठाण' चा रेकॉर्ड ब्रेक करणार कार्तिकचा 'शेहजादा'?,रिलीज आधीच सिनेमानं खिशात टाकले इतके करोड

सोशल मीडियावर आता नेटकरी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'या बाईला एवढं का महत्त्व दिलं जात आहे? ती फक्त लाइमलाइटमध्ये येण्यासाठी सगळं करत आहे'.

आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'हिच्या चेहऱ्यावरचं स्पष्ट दिसतंय की ती खोटारडी आहे'. तर कुणी एकानं लिहिलं आहे, 'राखी आणि ही एकसारख्याच आहेत'.

'किती घाणेरडी दिसतेय' अशी देखील एक कमेंट आहे. तर राखीनं हिला आणि आदिलला उगाचच फेमस केलं असं देखील म्हटलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com