Rakhi Sawant: राखी सावंतच्या आईची प्रकृती गंभीर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Sawant mother

Rakhi Sawant: राखी सावंतच्या आईची प्रकृती गंभीर...

ड्रामी क्वीन म्हणून जिचे नाव यासगळ्याना माहित आहे अशी राखी सावंत.. तिच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. राखीच्या आईची प्रकृती गंभीर झाली आहे.तिच्या आईला ब्रेन ट्युमर झाला असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा: Rakhi Sawant Video : बिग बॉसमधून बाहेर पडताच राखीला मोठा धक्का! थेट रुग्णालयातून...

राखीनं नऊ लाख रुपये घेतले आणि बिग बॉसच्या घरातून काढता पाय घेतला. आपण हे पैसे आपल्या आईच्या उपचारासाठी घेत असल्याचे म्हटले होते. बिग बॉसच्या चाहत्यांनी आपल्याला खूप प्रेम दिले. मराठी प्रेक्षकांची मी आभारी आहे. मला समजून घ्या.

हेही वाचा: Bigg boss marathi: राखी सावंत अक्षय केळकरला म्हणाली सगळ्यात मोठा भुंगा

याआधीही बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननं देखील काही महिन्यांपूर्वी राखीला मदत केली होती. ज्यावेळी तिची आई रुग्णालयात दाखल होती. आता ही तिच्या आईची प्रकृती चिंताजनक आहे. मनोरंजन विश्वातील सर्वच कलाकार आणि तिचे चाहते तिच्या आईच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत.

टॅग्स :Rakhi Sawant