बिग बॉसच्या घरात पुन्हा तांडव! Big Boss | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan Kundra

बिग बॉसच्या घरात पुन्हा तांडव

बिग बॉसच्या(Big boss) घरात नेहमीच काही ना काही तरी नवीन ड्रामा पहायला मिळत असतो. इथे आधी मैत्री पाहतो तशी नंतर दुश्मनीही पहायला मिळते,आधी प्रेम होतं अन् मग ब्रेकअपही होतं. आता प्रेम,मैत्री,ब्रेकअप चा विषय निघालाच आहे तर नक्कीच आपल्या मनात करण-तेजस्वीला घेऊन शंकेची पाल चुकचुकली असेल नाही का. तर आपली शंका बरोबर आहे. येत्या काही भागात आपल्याला करण आणि तेजस्वीत शमिता शेट्टीमुळे(Shamita Shetty) वाद झालेले पहायला मिळणरा आहेत. सध्या करण(Karan Kundra) आणि शमिता मध्ये चांगली मैत्री रंगतेय. अन् ते कुठेतरी तेजस्वीला खटकतंय. बरं हे राखी सावंतच्याही लक्षात येतंय हळूहळू की करण थोडा थोडा शमिताच्या जवळ जात चाललाय ते. तिनं तसं शमिताला बोलूनही दाखवलं.

इतकंच काय तर तेजस्वीनीने तर थेट करणलाच याचा जाब विचारला. शमितालाही तिनं सोडलं नाही. तेजस्वी करणला स्पष्ट म्हणाली,'' मी ज्याला माझा बॉयफ्रेंड मानते,त्यानं असं दुसऱ्या मुलीकडे झुकणं मला आवडणार नाही.'' यावर करणने मात्र तेजस्विला फटकारत म्हटलं,''मला जसं वागायचंय तसं मी वागेन, मला कुणी सांगू नये की मी कसं वागायचं''. इथे या दोघांमध्ये शमितावरनं खटके उडत असताना तिथं राखी शमिताला चिडवताना म्हणतेय,''करण तेजस्वीमध्ये फसला म्हणून, नाहीतर त्याची नजर तुझ्यावरच होती.'' आता हा प्रेमावरनं चाललेला वाद एखाद्या तांडवापेक्षा कमी नाही. आता पहायचं की खरंच तेजस्वीच्या संशयाला वैतागून करण तिला डिच्चू देणार का?

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top