
'रक्षाबंधन' चित्रपटाचं नव गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, जागरणात अक्षय तल्लीन
बाॅलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या चित्रपट रक्षाबंधनच्या (Raksha Bandhan) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रक्षाबंधनचे ट्रेलर ते गाणे प्रेक्षकांना आवडत आहे. सोशल मीडियात त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दरम्यान चित्रपटाचे नावे गाण 'डन कर दो' प्रदर्शित करण्यात आले आहे. यात अक्षय कुमार देवीच्या जागरणात तल्लीन झालेले दिसत आहे. हे गाण चाहत्यांना आवडत आहे. (Raksha Bandhan Movie New Song Done Kar Do Akshay Kumar Singing)
हेही वाचा: माझ्यावर खोटा आरोप, रिक्षाचालकाने सैराट फेम अरबाज शेखला स्पष्टच सांगितले
हिमेशने दिले संगीत
'डन कर दो' प्रचंड वेगाने यूट्यूबवर व्ह्यूज मिळवत असून चाहत्यांनाही ते आवडत आहे. या गाण्याला संगीत हिमेश रेशमियाने दिले आहे. गीत इरशाद कामिल यांनी लिहिले आहे. दुसरीकडे या गाण्याला नवराज हंस यांनी आपला आवाज दिला आहे. या गाण्याचे कोरिओग्राफी विजय गांगुली यांनी केले आहे. गाण्यात अक्षय कुमार (Akshay Kumar) भक्त बनल्याचे दिसत आहे.
हेही वाचा: निकने प्रियंकाला रोमाँटिक अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
'कंगन रुबी वाला'त भूमीबरोबर अक्षयची केमिस्ट्री जुळली
या पूर्वीच चित्रपटाचं गाण 'कंगन रुबी वाला' प्रदर्शित झालं होतं. यात अक्षय कुमारबरोबर भूमी पेडणेकर यांची जोरदार केमिस्ट्री जुळून आल्याचे पाहिला मिळाले होते. गाणे इरशाद कामिल यांनी लिहिले असून हिमेश रेशमियाने गीत गायले आहे. रक्षाबंधन हे सोशल मीडिया ड्रामा आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar), सहजमीन कौर, दीपिका खन्ना, सादी खतीब आणि स्मृती श्रीकांत यांची महत्त्वाची भूमिका आहे. आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केलेला रक्षाबंधन ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
Web Title: Raksha Bandhan Movie New Song Done Kar Do Akshay Kumar Singing
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..