Rakshabandhan 2023: मराठी मालिकांंमध्ये साजरे होणार आगळेवेगळे रक्षाबंधन, बहिण - भावाचा खास सण होणार साजरा

सोनी मराठी चॅनल त्यांच्या मालिकांमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा करणार आहेत
rakshabandhan 2023 sony marathi celebrates raksha bandhan in their serials maharashtrachi hasyajatra
rakshabandhan 2023 sony marathi celebrates raksha bandhan in their serials maharashtrachi hasyajatra SAKAL

Rakshabandhan 2023: आज रक्षाबंधन. बहिण - भावाच्या नात्याचा गोड सण. रक्षाबंधन निमित्ताने मराठी मालिकांंमध्ये रील लाईफ भावंडांमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा केला जाणार आहे.

अशातच सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी आपल्या मालिकांमधून नेहमी काहीतरी नवनवीन करण्याचा प्रयत्न करते. मालिकांचे विविध विषय असोत वा व्यक्तिरेखेची नवी एन्ट्री, हे नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. आत्ता ज्या मालिका सुरू आहेत त्यांत नेहमीच्याच उत्कंठावर्धक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आता मालिकांत वेगवेगळ्या प्रकारे रक्षाबंधन प्रसंग साजरे केले जाणार आहेत.

(rakshabandhan 2023 sony marathi celebrates raksha bandhan in their serials maharashtrachi hasyajatra)

rakshabandhan 2023 sony marathi celebrates raksha bandhan in their serials maharashtrachi hasyajatra
Prajakta Mali: "प्रेमात पडले आणि कळलंच नाही"; असं का म्हणतेय प्राजक्ता माळी?

'तुजं माज सपान' मालिकेत साजरं होणार रक्षाबंधन

'तुजं माज सपान' मालिकेत पैलवान प्राजक्ता आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी पुन्हा आपल्या घरी जाणार आहे, तर 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत मयूरीचा भाऊ भाऊसाहेब चक्क मयूरीलाच राखी बांधताना पाहायला मिळणार आहे. मयूरी ज्या प्रकारे आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी मेहनत करते आहे, आपल्या कुटुंबाची काळजी घेते आहे; त्यासाठी चक्क भाऊसाहेबच मयूरीला राखी बांधून एक आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे करणार आहेत.

राणी मी होणार मालिकेत साजरं होणार रक्षाबंधन

'राणी मी होणार' या मालिकेतही वेगळ्या प्रकारे रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. आपल्या कुटुंबाचे रक्षण करणाऱ्या मीरासाठी तिची बहीण मेघ थेट सलूनमध्ये राखी घेऊन पोहोचते. आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी झटणाऱ्या मीराला ती राखी बांधणार आहे आणि या बहिणींमधले प्रेम यातून दिसून येणार आहे.

rakshabandhan 2023 sony marathi celebrates raksha bandhan in their serials maharashtrachi hasyajatra
Prabhas Bald Look: आदिपुरुष फ्लॉप झाला आणि प्रभासच्या डोक्यावरचे केस गेले, अभिनेत्याच्या व्हायरल फोटोने चाहते हैराण

'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेत साजरं होणार रक्षाबंधन

'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' या मालिकेतही रक्षाबंधन पाहायला मिळणार आहे. एवढ्या वर्षांनी आपला भाऊ आरव आणि बहीण इरा यांना भेटल्यावर बयोला आनंद झाला आहे. रक्षाबंधन असल्यामुळे बयो आरवसाठी राखी घेऊन जाते. आता त्यांचे रक्षाबंधन कशा प्रकारे साजरे होईल, हे मालिकेत पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे रक्षाबंधनाचे आगळेवेगळे प्रसंग या मालिकांतून पाहायला मिळणार आहेत. बुधवार ३० ऑगस्ट रोजी आपल्या लाडक्या सोनी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजल्यापासून...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com