रकुलप्रीत सिंहने स्विकारले एनसीबीचे समन्स, चौकशीसाठी उद्या राहणार हजर

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 24 September 2020

गुरुवारी सकाळी रकुलप्रीत सिंहने एनसीबीचे समन मिळाले नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर एनसीबीने म्हटलं होतं की रकुल कारणं सांगतेय. एनसीबीच्या अधिका-यांनी रकुलशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता.

मुंबई-  बॉलीवूड ड्रग प्रकरणात नाव आल्याने अभिनेत्री रकुलप्रीत सिंहच्या अडचणीत वाढ होत आहे. सुरुवातीली एनसीबीचे समन्स मिळाले नसल्याचं सांगणा-या रकुलने आता समन्सचा स्विकार केला आहे. रकुलने एनसीबीला सांगितलं आहे की ती उद्या म्हणजेच शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहिल.

हे ही वाचा: दीपिका पदूकोण आज चार्टर विमानाने गोव्याहून मुंबईला होणार रवाना, एनसीबीच्या चौकशीसाठी उद्या राहणार हजर

गुरुवारी सकाळी रकुलप्रीत सिंहने एनसीबीचे समन्स मिळाले नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर एनसीबीने म्हटलं होतं की रकुल कारणं सांगतेय. एनसीबीच्या अधिका-यांनी रकुलशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र रकुलने त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नव्हता. 

एनसीबीचे अधिकारी केपीएस मल्होत्रा यांचं म्हणणं आहे की रकुलप्रीत सिंहला समन्स पाठवले गेले होते आणि तिला हरप्रकारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यामध्ये तिला अनेक कॉल देखील करण्यात आले. तिच्याकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालं नव्हतं. रकुल फोन उचलत नाहीये. रकुलप्रीत सिंहसोबतंच सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना देखील समन्स पाठवले गेले आहेत. त्यांची देखील येत्या काही तासात चौकशी केली जाईल. 

एएनआयने या प्रकरणात एनसीबीचं अपडेट देणारं ट्विट केलं आहे. यात ट्विटमध्ये म्हटलंय की 'होय, रकुलप्रीत सिंहने एनसीबीचे समन्स आता स्विकारले आहेत तसंच तिचा आत्ताचा पत्ता देखील ती अपटेड करत आहे.'  

rakulpreet singh has acknowledged the summons and updated her latest address ncb  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rakulpreet singh has acknowledged the summons and updated her latest address ncb