RRR Movie:रामचरणने टीम मेंबर्सला दिलं प्रत्येकी 1 तोळा सोन्याचं नाणं गिफ्ट

रामचरणने 'RRR' सिनेमाच्या ३५ क्रु मेंबर्सना ब्रेकफास्टसाठी निमंत्रण देत चक्क सरप्राइज गिफ्ट दिलं आहे.
Ramcharan( 'RRR' Movie actor)
Ramcharan( 'RRR' Movie actor)Google

राजामौली (S.S.Rajamouli) दिग्दर्शित 'RRR' सिनेमानं बॉक्सऑफिसचे सगळे रेकॉर्ड जवळपास तोडले आहेत. प्रेक्षकांनी सिनेमाला अगदी डोक्यावर उचलून धरलंय. १० व्या दिवशी RRR ने जगभरात ९०० करोडचा बिझनेस केला आहे. आपल्या सिनेमाच्या यशावर RRR चा मुख्य अभिनेता रामचरण(Ramcharan) भलताच खूश झालेला आहे. त्याने चक्क पूर्ण RRR च्या युनिट मेंबर्सना सोन्याची नाणी वाटली आहेत.

Ramcharan( 'RRR' Movie actor)
'या' वादग्रस्त विधानांनी रणबीर अनेकदा सापडलाय अडचणीत; काय म्हणाला होता?

बातमी आहे की,रामचरण ने RRR मिळालेल्या यशावर भारावून जाऊन जवळपास ३५ क्रु मेंबर्सना ब्रेकफास्ट साठी निमंत्रण देत चक्क सरप्राइज गिफ्ट दिलं. त्याने सिनेनिर्मितीतील वेगवेगळ्या डीपार्टमेंटमधील कॅमेरा असिस्टंट,प्रॉडक्शन मॅनेजर, अकाउंटंट,छायाचित्रकार,दिग्दर्शकीय विभाग,आणि इतर वेगवेगळ्या विभागातील लोकांना निमंत्रण दिलं होतं. ब्रेकफास्ट नंतर रामचरणने क्रु मेंबर्सना मिठाई आणि १० ग्राम सोन्याचं नाणं प्रत्येकी गिफ्ट म्हणून दिलं. त्या सोन्याच्या नाण्यावर एका बाजूला RRR चं साइन आहे तर दुसऱ्या बाजूला रामचरणचे नाव आहे. एवढं महागडं गिफ्ट क्वचितच कुणा अभिनेत्यानं आपल्या टीमला दिलं असेल. पण,RRR च्या यशानंतर क्रु मेंबर्सला त्यांच्या मनेहनतीचं असं फळ मिळायला हवंच होतं असं बोलंल जात आहे.

Ramcharan( 'RRR' Movie actor)
1968 मध्ये भारतात 'ग्रामी' पुरस्कार पहिल्यांदा आला;आतापर्यंतचे विजेते कोण?

RRR सिनेमात राम चरणने अल्लूरी सीतारामन राजू ची भूमिका वठवली आहे. तर ज्युनिअर एनटीआर ने कोमाराम भीम ची व्यक्तिरेखा साकारली आहे. दोघांनीही उत्तम अभिनय,नृत्यानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. हा सिनेमा २५ मार्च,२०२२ रोजी विविध भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर अजूनही या सिनेमानं दरारा निर्माण केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com