
RRR चा दरारा! सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळालं नामांकन..टॉम क्रूझ आणि ब्रैड पिटला देणार टक्कर
एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटानं अनेक रेकॉर्ड केले आहे मात्र संपुर्ण भारताच लक्ष लागलयं ते आता ऑस्कर-2023 च्या निकालावर..या चित्रपटानं आणखी एक मोठी कामगिरी केली आहे.
'नाटू नाटू' साठी गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणाऱ्या या चित्रपटाला ऑस्कर-2023 मध्ये 'बेस्ट ओरिजनल स्कोर' श्रेणीमध्ये नामांकनही मिळाले आहे.
आता ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांना क्रिटिक्स चॉईस सुपर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळालं आहे. विशेष म्हणजे हे दोघेही या पुरस्कारासाठी टॉम क्रूझ आणि ब्रॅड पिट यांच्याशी त्यांची स्पर्धा असणार आहे.
क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सची नामांकनं गुरुवारी जाहीर करण्यात आली असून 'टॉप गन: मेवरिक' साठी टॉम क्रूझ आणि 'बुलेट ट्रेन'साठी ब्रॅड पिट यांनाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले आहे.
तर आरआरआरसाठी ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या नावाचा सामावेश आहे.
गुरुवार, 23 फेब्रुवारी रोजी क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स वेबसाइटवर नामांकनांची घोषणा करण्यात आली. तर 16 मार्च रोजी विजेत्यांची घोषणा केली जाईल.
विशेष म्हणजे याआधी 13 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 5:30 वाजता 95 व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा होणार आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी राम चरण आधीच अमेरिकेत पोहोचला आहे.