'स्वप्न पूर्ण झाले', Yentamma मध्ये सलमानसोबत डान्स करुन राम चरण खुश

सुपरस्टार राम चरण देखील सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात कॅमिओ करताना दिसला होता.
yentamma song
yentamma song Sakal
Updated on

बॉलिवूडचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'मधील 'येनतम्मा' हे गाणे रिलीज होताच चर्चेत आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये सलमान खान साऊथचे सुपरस्टार राम चरण आणि दग्गुबती व्यंकटेश यांच्यासोबत साऊथ इंडियन लूकमध्ये डान्स करताना दिसत आहे. काही वेळातच या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. आतापर्यंत जवळपास 43 दशलक्ष व्ह्यूज झाले आहेत. राम चरण यांनी या गाण्याबद्दल सांगितले आहे.

राम चरण त्यांच्या 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्यासाठी मिळालेल्या ऑस्कर पुरस्कारासाठी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. ही त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती आणि त्याच्या चाहत्यांनाही खूप आनंद झाला. आता राम चरण सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटात धमाकेदार डान्स करताना दिसला. आता हा अनुभव लहान मुलाचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखी भावना असल्याचे त्याने सांगितले.

yentamma song
Karan Johar: दीपिकासमोर करण जोहरने केले अनुष्का शर्माबद्दल धक्कादायक विधान, म्हणाला...

'येनतम्मा'च्या बीटीएस व्हिडिओमध्ये राम चरणने सलमान खानसोबत डान्स करताना आपल्या भावना शेअर केल्या आहेत. राम म्हणतो, “हे गाणे धमाकेदार आहे, हे सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे. एका लहान मुलाचे स्वप्न पूर्ण झाले. हे गाणे करताना मजा आली. खूप खूप धन्यवाद सलमान भाई. लव्ह यू सो मच". सध्या या गाण्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे.

पायल देव यांनी 'येनतम्मा' संगीतबद्ध केले आहे. हे रफ्तार, विशाल ददलानी आणि पायल देव यांनी गायले आहे. या गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांचे आहेत. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन जानी मास्तर यांनी केले आहे.

सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' 21 एप्रिल 2023 रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी आणि सिद्धार्थ निगम असे अनेक स्टार्स दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com