शर्लिन चोप्राला या प्रसिद्ध दिग्दर्शकाने पाठवला होता अश्लील व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 August 2019

बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल शर्लिन चोप्रा सध्या तिच्या एका खुलाशामुळे चर्चेत आहे. नुकताच तिने दिग्दर्शक व निर्माता राम गोपाल वर्माबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितलं की, राम गोपालने तिला एडल्ड फिल्मचं प्रपोजल व अश्लील व्हिडिओ पाठवले होते. सध्या याचीच जाेरदार चर्चा होते आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल शर्लिन चोप्रा सध्या तिच्या एका खुलाशामुळे चर्चेत आहे. नुकताच तिने दिग्दर्शक व निर्माता राम गोपाल वर्माबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितलं की, राम गोपालने तिला एडल्ड फिल्मचं प्रपोजल व अश्लील व्हिडिओ पाठवले होते. सध्या याचीच जाेरदार चर्चा होते आहे.

एका मुलाखतीत शर्लिनने सांगितलं की, २०१६ साली मी राम गोपाल वर्माला व्हॉट्सअपवर काही फोटो पाठवले होते आणि माझे वर्क प्रोफाईल सांगितलं होतं. त्यांना मी त्यांच्या प्रेझेंट प्रोजेक्टबद्दल विचारलं व सांगितलं की, मी तुमचे अनेक चित्रपट पाहिले आहेत. तुमचे चित्रपट मला आवडले आहेत. मला तुमच्या साेबत काम करायला आवडेल.

शर्लिनच्या सांगण्यानुसार राम गोपाल वर्माने तिला एडल्ट चित्रपटाची स्क्रिप्ट व अश्लील व्हिडिओ पाठवले व म्हणाले की, ही माझी स्क्रीप्ट आहे आणि हा व्हिडिओ बघ व मला काय ते सांग. याबाबत शर्लिन म्हणाली की, जेव्हा मी वर्माची स्क्रीप्ट वाचली तर त्यात कोणतीच स्टोरी नव्हती. फक्त एडल्ड सीन्स होते. शर्लिनने स्क्रीप्ट पाहून सांगितलं की, असं कसं होऊ शकतं? एक होता राजा, एक होती राणी. राजाने राणीसोबत केलं सेक्स आणि संपली स्टोरी. 

शर्लिनच्या सांगण्यानुसार राम गोपालने सांगितलं होतं की, त्याच्या स्क्रीप्टमध्ये तेच आहे जे शर्लिनला पाठवलं आहे. जर ती काम करण्यासाठी कम्फर्टेबल असेल तर त्यासोबत पुढेे जाऊ शकतो. हा चित्रपट एडल्ड मार्केटमध्ये प्रदर्शित होणार आहे. 
शर्लिनला जेव्हा सायबर क्राईममध्ये तक्रार केली नाही का?, हा प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली की, वर्माने हे काम करण्यासाठी जबरदस्ती केली नव्हती. आणि त्याने हे मॅसेज व्हॉट्सअपवर पाठवले होते. ज्या नंबरवरून मॅसेज आले होते तो नंबर आता ती वापरत नसल्याचाही तिने खुलासा केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ram gopal varma sent bollywood actress porn video