Ram Setu Controversy: 'रामसेतू'चा वाद पेटला! काय आहे कारण? |Ram Setu Akshay Kumar movie controversy bjp leader Subramanian Swamy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ram setu

Ram Setu Controversy: 'रामसेतू'चा वाद पेटला! काय आहे कारण?

Akshay Kumar Ram setu legal trouble : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या मागील वाद काही संपता संपत नसल्याचे दिसून आले आहे. आता तो त्याच्या (Bollywood Movies) रामसेतू या चित्रपटावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमारच्या रक्षाबंधन या चित्रपटावरुन त्याला (Ram Setu Movie) नेटकऱ्यांनी धारेवर धरले होते. आतापर्यतचा सर्वाधिक तोट्यातील चित्रपट म्हणून रक्षाबंधनला रेटिंगही देण्यात आले. बॉक्स ऑफिसवर आपटलेल्या रक्षाबंधननंतर रामसेतूच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटावरुन अक्षयला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. बीजेपीचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अक्षयला नोटीस पाठवली आहे.

रामसेतूमध्ये काही गोष्टींबाबत खोडसाळपणा करण्यात आला आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे रामसेतूवर सोशल मीडियावरुन कडाडून टीका करण्यात येत आहे. चित्रपटात तथ्यं न मांडता त्याला कल्पनाविलास करुन सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात अक्षयला आणखी एका वादाला सामोरं जावं लागणार आहे. यापूर्वी त्याच्या आणि आमिर खानच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे.

हेही वाचा: Akshay Kumar: 'दुसरं अपत्य पाहिजे तर...' ट्विंकलची अक्षयसमोर होती अजब अट

रामसेतूमध्ये अक्षय हा एका पुरातत्व अभ्यासकाची भूमिका करतो आहे. रामसेतूच्या बाबत काही मुद्दे चित्रपटात मांडण्यात आले आहे. त्यावरुन वाद सुरु झाला आहे. त्यात अक्षयनं चुकीच्या पद्धतीनं रामसेतूची मांडणी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. रामसेतू खरा की खोटा याविषयीचा शोध त्यातून घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्याचे त्या नोटीशीमध्ये म्हटले गेले आहे.

हेही वाचा: Laal Singh Chaddha: 'मैंने कहा था एक दिन मैं हसूंगा तुम रोओगे!' चतूरच्या मीम्सचा कहर

बीजेपीचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबईच्या चित्रपटकर्त्यांना नेहमीच खोट्य़ा गोष्टी दाखवण्याची सवय लागली आहे. त्यांनी प्रेक्षकांच्या भावनांशी खेळ केला आहे. त्यामुळे आता आपण त्यांना कायदेशीर नोटीस पाठवत आहोत.

Web Title: Ram Setu Akshay Kumar Movie Controversy Bjp Leader Subramanian Swamy Send Legal Notice

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..