Ramanand Sagars Ramayan : रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका पुन्हा 'दूरदर्शन'वर! झाली मोठी घोषणा

टीव्ही मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणून रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेचे नाव घेतले जाते.
Ramanand Sagar's OG Ramayan, featuring Arun Govil
Ramanand Sagar's OG Ramayan, featuring Arun Govilesakal

Ramanand Sagar's OG Ramayan, featuring Arun Govil : टीव्ही मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणून रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेचे नाव घेतले जाते. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केल्याचे दिसून आले आहे. आता या मालिकेच्या संदर्भातील एक नवीन अपडेट समोर आली आहे.

२२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचे उद्घघाटन अन् प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्याचे दिसून आले. यावेळी रामायण मालिकेचे निर्माते आणि त्या मालिकेत काम केलेल्या कलाकारांना देखील यावेळी निमंत्रित करण्यात आले होते. त्यात उल्लेख करायचा झाल्यास अरुण गोविल, दीपिका चिखलिया, सुनील लहरी हे सहभागी झाले होते. रामायण मालिकेत रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल आणि सीतेच्या भूमिकेतील दीपिका चिखलिया यांची लोकप्रियता कायम आहे.

रामायण मालिकेची लोकप्रियता पाहता आता या मालिकेच्याबाबत एक मोठी घडामोड समोर आली आहे. ती म्हणजे ही मालिका पुन्हा दूरदर्शनवरुन प्रसारित केली जाणार आहे. १९८७ मध्ये पहिल्यांदा रामायण मालिका ही दूरदर्शनवरुन टेलिकास्ट झाली होती. त्यानंतर आता दूरदर्शनच्या वतीनं पुन्हा एकदा ही मालिका टेलिकास्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

२५ जानेवारी १९८७ ते ३१ जुलै १९८८ पर्यत ही मालिका सुरु होती. ८२ टक्के प्रेक्षकांनी, दर्शकांनी ही मालिका पाहिल्याचे सांगण्यात येते. आतापर्यतचा रेकॉर्डब्रेक मिळालेला प्रतिसाद म्हणून त्याबाबत सांगितले जाते. दूरदर्शन नॅशनलनं केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, प्रभु श्रीराम हे पुन्बा आले आहेत. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय रामायण मालिका ही पुन्हा एकदा डीडी नॅशनल पाहता येणार आहे.

केव्हापासून ही मालिका प्रदर्शित होणार याबाबत माहिती समोर आलेली नाही. त्याच्या प्रदर्शनाच्याबाबत घोषणा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात देखील या मालिकेचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यावेळीही त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com