Rana Daggubati: 'बाहुबली'चा रोल न मिळाल्याने राणा दग्गुबती झाला होता दु:खी, केले अनेक खुलासे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rana daggubati

Rana Daggubati: 'बाहुबली'चा रोल न मिळाल्याने राणा दग्गुबती झाला होता दु:खी, केले अनेक खुलासे

साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेता राणा दग्गुबाती सध्या चर्चेत आहे. 10 मार्च रोजी, अभिनेत्याचा नेटफ्लिक्स शो 'राणा नायडू' रिलीज झाला, जो अमेरिकन मालिका 'रे डोनोव्हन' चे हिंदी रूपांतर आहे. आता अभिनेता शोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी त्याने शोचे नाव त्याच्या नावावर ठेवल्याचा खुलासाही केला. त्याचवेळी राणाने 'बाहुबली' या सुपरहिट चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेबद्दलही सांगितले.

मुलाखतीदरम्यान अभिनेत्याला विचारण्यात आले की, तुम्ही तुमच्या आयुष्यात दोन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पहिला 'बाहुबली' आणि दुसरा 'बाहुबली 2', पण तू एसएस राजामौलीच्या चित्रपटात 'बाहुबली'ची भूमिका साकारली नाहीस. तुला ह्याचे वाईट वाटते का? यावर अभिनेत्याने मजेशीरपणे उत्तर दिले.

तो म्हणाला, 'नाही, मला वाईट वाटत नाही, पण मला मारण्यासाठी दोन बाहुबलींची गरज होती. हेच जीवन आहे'. यासोबतच अभिनेता एसएस राजामौलीसोबतच्या त्याच्या नात्याबद्दलही बोलला. राजामौली हे माझे बॉस आणि कॅप्टन आहेत, असे तो म्हणाला. माझे आणि त्यांचे नाते सन्माननीय आहे.

एसएस राजामौली यांचा 'बाहुबली: द बिगिनिंग' आणि 'बाहुबली: द कन्क्लूजन' हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. पहिला चित्रपट 2015 मध्ये आला होता, तर दुसरा चित्रपट 2017 मध्ये आला होता.

या चित्रपटात राणाने 'भल्लालदेव'ची भूमिका साकारली होती तर अभिनेता प्रभास 'बाहुबली'च्या भूमिकेत दिसला होता. यासोबतच या चित्रपटात अनुष्का शेट्टी, तमन्ना, रम्या कृष्णा, सत्यराज आणि नस्सर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

राणा दग्गुबती आणि व्यंकटेश यांची वेब सिरीज 'राणा नायडू' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झाली आहे, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिरीजमध्ये राणा एका सेलिब्रिटी फिक्सरची भूमिका साकारत आहे. तर व्यंकटेश त्याच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. या सिरीजमध्ये 10 भाग आहेत, त्यापैकी दोन भाग प्रदर्शित झाले आहेत.

टॅग्स :Entertainment news