Video : कोल्हापुरातल्या महापुरात अडकले राणादा-अंजली!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

'तुझ्यात जीव रंगला' फेम राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि अंजलीबाई अर्थात अक्षया देवधर कोल्हापुरातल्या महापुरात अडकल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या मालिकेचे शूट संपवून सगळी टीम पाण्यातून वाट काढत चालल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर : मागील दोन दिवसांपासून कोल्हापूरसह सांगलीत पावसाने थैमान घातलंय. नागरिकांचे हाल होत आहेत. अशातच 'तुझ्यात जीव रंगला' फेम राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि अंजलीबाई अर्थात अक्षया देवधर कोल्हापुरातल्या महापुरात अडकल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या मालिकेचे शूट संपवून सगळी टीम पाण्यातून वाट काढत चालल्याचे चित्र आहे.

तुझ्यात जीव रंगलाचे शूटींग कोल्हापुरात सुरू आहे. हे कलाकार जिथे राहतात त्या इमारतीत पुराचे पाणी शिरले. त्यामुळे अक्षया, हार्दिक, धनश्री काडगावकर यांना पाण्यातून वाट काढत जावे लागले. त्यांच्यासोबत मालिकेची इतर टीमही होती. 

कृष्णा खोऱयात महापुराचे थैमान सुरू आहे. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या महापुराने कोल्हापूर आणि सांगली ही दक्षिण महाराष्ट्रातील दोन्ही शहरे अभूतपूर्व संकटात आहेत. कोल्हापुरात नौदल आणि सागरी सीमा सुरक्षा दलाचे बचाव पथक दाखल झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranada and Anjali from tuzyat rangla stuck in flood at Kolhapur