Ranbir at Arijit concert: अरिजित समोर 'अ‍ॅनिमल' झुकला! रणबीर कपूरच्या व्हिडिओनं जिंकलं चाहत्यांचं मन

Ranbir Kapoor at Arijit Singh concert: सध्या रणबीर कपूर 'अ‍ॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Ranbir Kapoor at Arijit Singh concert
Ranbir Kapoor at Arijit Singh concert Esakal

Ranbir Kapoor Arijit Singh Video: रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. लेखक-दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यामुळे या चित्रपटाची वेगळीच चर्चा आहे. या चित्रपटाचा टिझर आणि पोस्टर रिलिज झाल्यानंतर चाहते खुपच उत्सुक आहेत. त्यानंतर या चित्रपटाची दोन गाणी रिलिज झाली आहे.

या गाण्याना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता रणबीर कपुरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चंदीगड कॉन्सर्टमधील आहे ज्यात अरिजित सिंग गाणे गाताना दिसत आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटासाठी एका कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते.

Ranbir Kapoor at Arijit Singh concert
Who is Orry: ना हिरो ना स्टारकीड तरीही अंबानी - दीपिका सगळ्यांसोबत दिसणारा ओर्री आहे तरी कोण?

चंदीगड कॉन्सर्टमध्ये अरिजित सिंगने आपल्या आवाजाने सर्वांची मने जिंकली. अरिजितने आपल्या आवाजाने तरुणाईला थिरकायला भाग पाडले.

या कॉन्सर्टमध्ये अरिजित सिंहने चित्रपटातील 'सतरंगा' गाण्यावर परफॉर्म करत होता. अरिजित गाणे गात असतानाच रणबीर कपूर स्टेजवर आला.

त्यानंतर अरिजित सिंगला पाहताच रणबीर कपूरने त्याच्यासमोर डोकं टेकवलं. यावेळी रणबीर अरिजितच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहे. रणबीरचा आदर पाहिल्यानंतर अरिजितनेही त्याला मिठी मारली.

Ranbir Kapoor at Arijit Singh concert
एल्विशला अटक का नाही केली? कोटा पोलिसांनी दिले स्पष्टिकरण!

सध्या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी दोघांच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. यावेळी रणबीर कपूरने अरिजित सिंगच्या कॉन्सर्टमध्ये सामील होऊन चन्ना मेरेया गाण्यावर जोरदार डान्स केला.

या कॉन्सर्टमध्ये अरिजित सिंगने रणबीर कपूरसाठी चन्ना मेरेया, ए दिल है मुश्किल, सतरंगा आणि केसरिया अशी गाणी गायली आहेत. या कॉन्सर्टचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Ranbir Kapoor at Arijit Singh concert
Sanjay aka Tutu Nayak: महिला पत्रकाराला मारहाण आणि गैरवर्तन, प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला अटक

सध्या रणबीर कपुर त्याच्या अ‍ॅनिमल चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यस्त आहेत. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची सोशल मिडियावर क्रेझ आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com