Animal On Netflix : रणबीरच्या 'ॲनिमल'चं नवं रेकॉर्ड! जवान अन् सालारला टाकलं मागे, तब्बल 20.8 मिलियन प्रेक्षकांनी...

साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या ॲनिमल या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
Ranbir Kapoor's Animal logs 20.8 mn viewing hours on Netflix
Ranbir Kapoor's Animal logs 20.8 mn viewing hours on Netflixesakal

Ranbir Kapoor's Animal logs 20.8 mn viewing hours on Netflix : साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या ॲनिमल या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यंदाच्या फिल्म फेयर पुरस्कार (Filmfare Award 2024) सोहळ्यामध्ये देखील ॲनिलमच्या वाट्याला अनेक पुरस्कार मिळाले होते. यावेळी रणबीरला प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (Best Actor) पुरस्कारही या चित्रपटाला मिळाला होता.

आता ॲनिमलच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. २६ जानेवारी (Animal Released On Netflix) रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. त्याबाबत मोठी अपडेट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या चित्रपटानं नव्या वर्षात नेटफ्लिक्सला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले )(Ranbir Kapoor Latest News) आहे. आठ आठवड्यांच्या प्रतिक्षेनंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

ॲनिमल ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल २०.८ मिलियन व्ह्युविंग हावर्स मिळाले असून त्याला ६.२ प्रेक्षकांनी तो चित्रपट पाहिल्याचे सांगण्यात येत आहे. ही कामगिरी या चित्रपटानं तो ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या तीनच दिवसांत केल्याचे दिसून आले आहे. ही कामगिरी करत या चित्रपटानं प्रभासच्या सालार १ सीझफायर आणि शाहरुख खानच्या जवानला मागे टाकले आहे.

ॲनिमलच्या या कामगिरीवर सध्या सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. सॅकल्निकनं दिलेल्या माहितीनुसार ॲनिमलनं गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अनेक बिग बजेट चित्रपटांना मागे टाकले आहे. सालारविषयी बोलायचे झाल्यास त्याला १०.३० मिलियन व्ह्यु आवर्स मिळाले होते. तर ३.५ मिलियन प्रेक्षकांनी तो चित्रपट पाहिला होता. .

अशाप्रकारे ॲनिमलनं केवळ व्हिवर्सशीपमध्ये अव्वल स्थान पटकावले असे नाही तर भारतातील नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेंडिंग चार्टमध्ये देखील तो सर्वोच्च स्थानी असल्याचे सांगण्यात येत आहे. दुबई, श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तान, कतार आणि मॉरिशियस देशांच्या तुलनेत भारतानं याबाबत बाजी मारली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com