Ranbir Kapoor Viral Video : श्रीरामाच्या दर्शनाला आला की कतरिना सोबत फोटो काढायला? रणबीरच्या 'त्या' सेल्फीची चर्चा!

योध्येत पार पडलेल्या राम मंदिराच्या उद्घघाटनाला आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित (Ram Mandir Bollywood Celebrity) होते.
Ranbir Kapoor secretly try to take a selfie with Katrina Kaif
Ranbir Kapoor secretly try to take a selfie with Katrina Kaif

Ranbir Kapoor secretly try to take a selfie with Katrina Kaif : अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिराच्या उद्घघाटनाला आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित (Ram Mandir Bollywood Celebrity) होते. या सगळ्यात चर्चा होती ती बॉलीवूडमधील सेलिब्रेटींची. या मध्ये केवळ बॉलीवूडच नाही तर दाक्षिणात्य (Bollywood Latest News) चित्रपट विश्वातील कलाकारांनी देखील या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता.

सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडिओ (Ranbir Kapoor Latest News) व्हायरल होतो आहे. त्यामध्ये रणबीर हा सेल्फी काढताना दिसत आहे.त्याच्या बाजूला आलिया आहे तर मागे विकी कौशल अन् कतरिना दिसत आहे. प्रख्यात दिग्दर्शक सुभाष घई एक व्हिडिओ शूट करताना दिसत आहे. अशावेळी रणबीरची सेल्फीसाठी चाललेली गडबड नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. वुम्पालानं तो व्हिडिओ शेयर केला आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बिग बी अमिताभ बच्चन, रजनीकांत, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, आयुषमान खुराना, कंगना रनौत, कतरिना कैफ, रोहित शेट्टी, चिरंजीवी हे कलाकार उपस्थित होते. याशिवाय प्रसिद्ध गायक सोनू निगम, अनु मलिक अन् अनुराधा पौडवाल हेही हजर होते.

प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर सेलिब्रेटींनी त्यांचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्याला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. मात्र काही नेटकऱ्यांनी सेलिब्रेटींना ट्रोल केले आहे. यात रणबीरला सर्वाधिक ट्रोल केले जात आहे. त्याची एक्स गर्लफ्रेंड असणाऱ्या कतरिनाचा तो सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो आहे असे त्या प्रतिक्रियांमधून नेटकरी म्हणत आहेत.

त्या सोहळ्याला हजर असणाऱ्या अनेक उपस्थितांनाही सेलिब्रेटींसोबत सेल्फी काढण्याचा मोह काही केल्या आवरला नाही. या सगळ्यात रणबीरनं सेल्फी घेण्याचा प्रयत्न त्याच्या ट्रोलिंगचे कारण ठरताना दिसतो आहे. त्याचं झालं असं की, सुभाष घई एक व्हिडिओ शुट करताना दिसत आहेत. त्यांच्या मागील खुर्चीवर श्लोका अंबानी आणि आलिया भट्ट एकमेंकीसोबत बोलताना दिसत आहेत. दुसरीकडे रणबीर हा सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो आहे.

Ranbir Kapoor secretly try to take a selfie with Katrina Kaif
Ram Mandir : जगभरात श्रीरामाचा जयघोष! सुमारे 40 देशात साजरा झाला आनंदोत्सव

यात गमतीशीर गोष्ट अशी आहे की, रणबीर सेल्फी घेत असताना त्याच्या मागील खुर्चीवर कतरिना आणि विकी कौशल बसलेले दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी रणबीरला ट्रोल केले आहे. एका युझर्सनं म्हटले आहे की, रणबीर तू प्रभु श्रीरामाच्या दर्शनाला आहेस आणि सेल्फी घेण्यासाठी तुझा एवढा का प्रयत्न सुरु आहे? या सारख्या वेगवेगळया प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com