Ranbir Kapoor: रणबीरच्या मोबाईल फेकण्यामागे होतं 'हे' कारण... व्हिडिओ आला समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor Mobile Controversy

Ranbir Kapoor Mobile Controversy: रणबीरच्या मोबाईल फेकण्यामागे होतं 'हे' कारण... व्हिडिओ आला समोर

Ranbir Kapoor Mobile Controversy: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये, एक चाहता रणबीर कपूरसोबत फोटो काढण्यासाठी आल्यावर रणबीर चाहत्याचा फोन फेकून देतो. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि लोकांनी रणबीरला ट्रोल करायला सुरवात केली. मात्र आता या व्हिडिओचं सत्य समोर आलं आहे.

रणबीरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सला त्याचा खूप राग आला आहे. या व्हिडिओत रणबीर कपूर हसत हसत त्या चाहत्यासोबत सेल्फी काढत होता, पण जेव्हा त्यावेळी चाहत्याला सेल्फी काढता येत नाही, तेव्हा रणबीर कपूर रागावतो आणि त्या चाहत्याचा फोन फेकून देतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच असं वाटेल की रणबीरला इतका काय ऑटिट्यूड आला की त्याने फोनच फेकला.

मात्र या व्हिडिओ मागे नेमकं कारण वेगळचं आहे. हा व्हिडिओ कुठला रस्त्यावरील किंवा कार्यक्रमातील नसून एका मोबाईल कंपनीची जाहिरात आहे. यात पुर्ण व्हिडिओ दिसत आहे. यामध्ये रणबीर मोबाईल फेकल्यानंतर त्या चाहत्याला त्या कंपनीचा दुसरा फोन गिफ्ट देतोय.

रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आजकाल अभिनेता त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निघाला आहे. अशा परिस्थितीत रणबीर कपूरचा हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र हा व्हिडिओ फक्त प्रमोशनसाठी होता.