व्हिडिओ: रणबीर कपूरने नवीन वर्षात दिलं सरप्राईज, आगामी 'ऍनिमल' सिनेमाची केली घोषणा

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 1 January 2021

रणबीरने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १२ वाजून १ मिनिटांनी त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली. रणबीरने त्याच्या या नवीन सिनेमाची घोषणा करत चाहत्यांना जबरदस्त सरप्राईज दिलं.

मुंबई- बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने २०२१ं म्हणजेच नवीन वर्षाचं धमाकेदार स्वागत केलं आहे. रणबीरने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १२ वाजून १ मिनिटांनी त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली. रणबीरने त्याच्या या नवीन सिनेमाची घोषणा करत चाहत्यांना जबरदस्त सरप्राईज दिलं. त्याच्या या सिनेमाचं नाव 'ऍनिमल' असून त्याचं दिग्दर्शन कबीर सिंह फेम संदीप रेड्डी करणार आहेत. टी सिरीजच्या वतीने त्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. रणबीरच्या चाहत्यांना आता या सिनेमाविषयी जाणून घेण्याची जास्त उत्सुकता आहे. 

हे ही वाचा: मलाईकाचा ट्रेंडिंग हिरवा ड्रेस, केवळ ६ हजारात तुम्ही करु शकता खरेदी  

याबाबतची खास गोष्ट अशी की रणबीर कपूरसोबत या सिनेमात अनिल कपूर, परिणीती चोप्रा आणि बॉबी देओल असणार आहेत. अनिल कपूर आणि बॉबी देओलने त्यांच्या सोशल मिडियावर देखील या सिनेमाचा टिझर व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतंच त्यांनी हा सिनेमा सुरु होण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूरचा आवाज बॅकग्राऊंडमध्ये ऐकायला मिळतोय ज्यामध्ये तो त्याच्या वडिलांविषयी सांगत आहे. 

या टिझर व्हिडिओमधून कळतंय की हा सिनेमा एक कौटुंबिक ड्रामा असेल. व्हिडिओमध्ये रणबीरच्या आवाजाच ऐकायला मिळतंय, ''बाबा पुढच्या जन्मी तुम्ही माझा मुलगा बना मग पाहा मी तुमच्यावर कसं प्रेम करतो आणि तुम्ही देखील ते शिका. कारण त्याच्या पुढच्या जन्मी मी पुन्हा तुमचा मुलगा आणि तुम्ही माझे बाबा. तेव्हा ना तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रेम करा माझ्यासारखं नाही. तुम्हाला समजतंय ना बाबा. बस्स तुम्ही हे समजा ऐवढंच खूप आहे.'' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

या सिनेमात सुरुवातील परिणीती चोप्राच्या जागी सारा अली खानला घेणार असल्याची चर्चा होती. रणबीरच्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्स करत याबाबत उत्सुकता दर्शवली आहे. रणबीरचे हे डायलॉग ऐकून तर सिनेमाची कहाणी नेमकी काय असेल याची देखील उत्सुकता आहे.   

ranbir kapoors new year treat for fans as he announced new film animal  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranbir kapoors new year treat for fans as he announced new film animal