esakal | युट्यूब व्हिडिओत 'रंग दे बसंती' फेम सिद्धार्थ मृत घोषित; तक्रारीवर अजब उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Siddharth

युट्यूब व्हिडिओत 'रंग दे बसंती' फेम सिद्धार्थ मृत घोषित; तक्रारीवर अजब उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता सिद्धार्थ Siddharth सध्या पेचात पडला आहे. कारण एका युट्यूब व्हिडीओमध्ये त्याला चक्क मृत घोषित करण्यात आलं आहे. एका चाहत्याने सिद्धार्थचा हा व्हिडीओ पाहिला आणि त्याने ट्विटरवर सिद्धार्थला टॅग करत त्याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर सिद्धार्थनेही नेटकऱ्यांचा गैरसमज होऊ नये आणि चुकीची माहिती पसरू नये यासाठी संबंधित व्हिडीओबाबत युट्यूबकडे तक्रार केली. मात्र तक्रारीनंतर सिद्धार्थला युट्यूबकडून अजबच उत्तर मिळालं. (rang de basanti fame actor Siddharth reports YouTube video that claimed he is dead gets shocking response slv92)

'माझा मृत्यू झालाय, असं म्हणणाऱ्या या व्हिडीओबद्दल मी युट्यूबकडे तक्रार केली. त्यावर त्यांनी मला उत्तर दिलं की, माफ करा पण आम्हाला या व्हिडीओत काहीच प्रॉब्लेम दिसत नाहीये', असं सिद्धार्थने ट्विट करत सांगितलं. 'कमी वयातच जग सोडून गेलेले १० दाक्षिणात्य सेलिब्रिटी' या आशयाचा तो व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये सौंदर्या, आरती अग्रवाल यांसारख्या सेलिब्रिटींसोबत सिद्धार्थचाही उल्लेख आहे.

हेही वाचा: व्हॅनिटी व्हॅनमध्ये विकी कौशलचा जबरदस्त रॅप; दीपिका, हृतिकही प्रभावित

सिद्धार्थने २००३ साली 'बॉईज' या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर सिद्धार्थने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या. आमिरच्या 'रंग दे बसंती' या चित्रपटातही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर सक्रिय असणारा सिद्धार्थ अनेकदा चालू घडामोडींवर त्याचं मत व्यक्त करत असतो.

loading image