esakal | व्हॅनिटी व्हॅनमध्ये विकी कौशलचा जबरदस्त रॅप; दीपिका, हृतिकही प्रभावित
sakal

बोलून बातमी शोधा

vicky kaushal

व्हॅनिटी व्हॅनमध्ये विकी कौशलचा जबरदस्त रॅप; दीपिका, हृतिकही प्रभावित

sakal_logo
By
स्वाती वेमूल

आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकून घेणारा अभिनेता विकी कौशलने Vicky Kaushal रविवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये विकी व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून रॅप गाताना दिसत आहे. सोफी टक्करचा 'पर्पल हॅट' Purple Hat हा रॅप साँग गातानाचा विकीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडिओला अवघ्या १३ तासांत १८ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले असून नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटीसुद्धा प्रभावित झाले आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण, हृतिक रोशन यांनीसुद्धा विकीच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. (Vicky Kaushal impresses Deepika Padukone and Hrithik Roshan with rap video slv 92)

शूटिंगसाठी तयार होत असताना व्हॅनिटी व्हॅनमध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळेत विकीने हा व्हिडीओ शूट केला आहे. 'क्यूट वाटलं म्हणून हा व्हिडीओ पोस्ट करतोय. मात्र १०० टक्के नंतर हा डिलिट करेन. अभिनयाची मनापासून इच्छा होती', असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओमध्ये विकीने ज्याप्रकारे एकही शब्द न चुकता लिक सिंक केलंय, ते पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल! विकीच्या या व्हिडीओवर दीपिकाने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. तर हृतिकने हा व्हिडीओ आवडल्याचं कमेंटमध्ये लिहिलं. तन्मय भट्ट, क्रिती सनॉन, आयुषमान खुराना अशा इतरही काही सेलिब्रिटींनी विकीचं कौतुक केलंय.

हेही वाचा: 'आई कुठे काय करते' मालिकेत अनिरुद्ध देशमुखच्या भावाची होणार एंट्री

विकी कौशल सध्या आदित्य धर दिग्दर्शित 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. विकीचा सरदार उधम सिंग हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. विकीने बॉलिवूडमध्ये नुकतेच नऊ वर्षे पूर्ण केली आहेत. २०१२ मध्ये विकीने त्याचं पहिलं ऑडिशन दिलं होतं. 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटासाठी विकीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

loading image