Mrs. Chatterjee vs Norway Review: कसा आहे राणी मुखर्जीचा नवीन सिनेमा? जाणून घेण्यासाठी review वाचाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mrs. Chatterjee vs Norway Review, Mrs. Chatterjee vs Norway, rani mukherjee

Mrs. Chatterjee vs Norway Review: कसा आहे राणी मुखर्जीचा नवीन सिनेमा? जाणून घेण्यासाठी review वाचाच

Mrs. Chatterjee vs Norway Review: राणी मुखर्जीच्या आगामी सिनेमा Mrs. Chatterjee vs Norway सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे आज १७ मार्चला जगभरात प्रदर्शित झालाय.

हा सिनेमा चांगला कि वाईट, थिएटरमध्ये पाहण्यासारखा आहे का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला आहोत.

(rani mukherjee new movie Mrs. Chatterjee vs Norway Review )

काय आहे सिनेमाची कथा:

2007 मध्ये भू - भौतिकशास्त्रज्ञ (geophysicist) अनुरूप भट्टाचार्य यांच्याशी लग्न केल्यानंतर सागरिका भट्टाचार्य नॉर्वेला गेली. 2008 मध्ये सागरिकाने तिचा मुलगा अभिज्ञानला जन्म दिला.

अभिज्ञान मोठा होत असताना सागरिकाला समजले की तिच्या मुलामध्ये ऑटिझमची लक्षणे आहेत, जो एक मेंदूचा विकार आहे. मुलावर उपचार होण्यासाठी सागरिका आणि अनुप यांनी नॉर्वेमध्ये प्रयत्न केले. अभिज्ञान केवळ 14 महिन्यांचा होता.

पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि कालांतराने त्याची प्रकृती बिघडली. काही काळानंतर सागरिकाला गोंडस मुलगी झाली. सर्व काही सुरळीत सुरु असताना खोटा बहाणा सांगून नॉर्वेची चाइल्ड वेलफेअर सर्व्हिसेस त्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन गेले.

मग पुढे स्वतःची मुलं परत मिळवण्यासाठी सागरिका आणि अनुरूप या दाम्पत्याला कोणत्या संघर्षाला तोंड द्यावे लागले याची कहाणी Mrs. Chatterjee vs Norway सिनेमातून मांडण्यात आली आहे.

सिनेमात पात्रांची नावं बदलली आहेत. डेबिका बॅनर्जीच्या प्रमुख भूमिकेत राणी मुखर्जी झळकत आहे. राणी मुखर्जी सागरिकाची भूमिका उत्तम साकारण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करते. पण राणीला पटकथा आणि लिखाणाची हवी तशी साथ मिळत नाही.

पण तरीही राणी तिचा अभिनय उत्कटपणे पडद्यावर मांडते. इतर भूमिकांमध्ये जीम सरभ, अनिर्बन भट्टाचार्य, नीना गुप्ता अशा कलाकारांनी त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे.

एकूणच आई तिच्या बाळासाठी संपूर्ण व्यवस्थेशी कशाप्रकारे लढा देऊ शकते याची कहाणी Mrs. Chatterjee vs Norway सिनेमातून बघायला मिळते.

अभिनयात सजलेला पण लिखाणात काहीसा गंडलेला Mrs. Chatterjee vs Norway एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे. राणी मुखर्जीच्या फॅन्ससाठी नक्कीच पर्वणी आहे.

टॅग्स :rani mukherjee