दीपिकाने रणबीर कपूरसोबत शेअर केलेल्या फोटोवर रणवीरने दिली अशी कमेंट..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

दीपिकाने पदूकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लूक टेस्टचा जुना फोटो शेअर केला होता. दीपिका रणबीरच्या या फोटोवर आता रणवीर सिंहने कमेंट केली आहे.

मुंबई- दीपिका पदूकोण आणि रणबीर कपूर यांच्या 'यै जवानी है दिवानी' या सिनेमाला नुकतीच ७ वर्ष पूर्ण झाली. दीपिकाने पदूकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लूक टेस्टचा जुना फोटो शेअर केला होता. दीपिका रणबीरच्या या फोटोवर आता रणवीर सिंहने कमेंट केली आहे.

हे ही वाचा: नर्गिससोबतच्या पहिल्याच भेटीत सुनील दत्त यांची झालेली बोलती बंद, अशी होती लव्हस्टोरी

दीपिकाने 'यै जवानी है दिवानी'च्या जुन्या आठवणींना उजाळा देत रणबीर कपूरसोबतचा लूक टेस्टचा फोटो पोस्ट केला होता. हा फोटो पोस्ट करताना दीपिकाने लिहिलं होतं, 'आमची पहिली लूक टेस्ट, आठवणी या मिठाईच्या डब्ब्यासारख्या असतात. एकदा का हा डब्बा उघडला तर केवळ एक तुकटा खाऊन समाधान होत नाही -नैना तलवार.'

दीपिकाच्या या इंस्टाग्राम पोस्टवर बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनी कमेंट केल्या होत्या. मात्र या सगळ्यांच्या कमेंटमध्ये एक कमेंट दीपिकासाठी खास होती. या कमेंटने खासकरुन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. रणवीरने पत्नी दीपिका आणि रणबीर कपूरच्या त्या फोटोवर क्युट अशी कमेंट केली आहे. 

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ये जवानी है दिवानी' या सिनेमात रणबीरने बनी हे पात्र तर दीपिकाने नैना हे पात्र साकारलं होतं. या सिनेमातील रणबीर-दीपिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. मोठ्या पडद्यावर आजही प्रेक्षक ही जोडी पाहण्यासाठी आतुर आहेत. रणबीर-दीपिकाची रिलेशनशिप चर्चेत राहिली असली तरी अनेकदा दोघांमध्ये मैत्री दिसून आलेली आहे. तसंच रणवीरही अनेकदा रणबीरसोबत मैत्री निभावताना दिसून आला आहे. त्यामुळे या फोटोवर रणवीरने केलेल्या या कमेंटचं चाहते कौतुक करत आहेत. 

रणवीर सिंग आणि दीपिका ही जोडी लग्नानंतर पहिल्यांदाच '८३' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी अयान मुखर्जीच्या 'ब्रह्नास्त्र' या सिनेमात झळकणार आहे. 

ranveer singh coment on deepika padukone and ranbir kapoor photos  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranveer singh coment on deepika padukone and ranbir kapoor photos