Deepika-Ranveer: चार वर्षानंतर दीपिका - रणवीरच्या नात्याला ग्रहण? ट्विटवर खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepika-Ranveer relation story

Deepika-Ranveer: चार वर्षानंतर दीपिका - रणवीरच्या नात्याला ग्रहण? ट्विटवर खुलासा

Deepika-Ranveer Reletion Story : रणवीर - दीपिकामध्ये ताटातूट होऊ नये असे लाखो चाहत्यांना वाटत असलं तरी त्या ट्विटनं मात्र लाखो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी रणवीर सिंग आणि दीपिकाच्या नात्यात सगळं काही आलबेल आहे असं नाही. त्यांच्यात कुरबुरी वाढल्यात हे सांगणारे ते ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी स्वत: अभिनेता रणवीरनं एका मुलाखतीमध्ये दीपिका आणि त्याच्याविषयी एक खुलासा केला होता त्यावरुन चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे.

बॉलीवूडमध्ये आता रणवीर सिंग आणि दीपिका हे दोन्ही मोठे स्टार झाले आहेत. त्यांच्या नावाची वेगळी ओळख तयार झाली आहे. बॉलीवूडमधील ब्रँडिंग स्टार म्हणून त्यांची नावं घ्यावी लागतील. त्यांच्या वैवाहिक नात्याला आता घरघर लागल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 2018 मध्ये त्यांनी लग्न केले. सध्या सोशल मीडियावर रणवीर आणि दीपिका ट्रेंड होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या त्या ट्विटमध्ये रणवीर - दीपिकामध्ये भांडणं होत असल्याचे सांगण्यात आले आहे. यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया पुढे आली आहे.

एका मुलाखतीमध्ये रणवीरनं दीपिकासोबतच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यावर चाहते खुश झाले होते. मात्र त्या ट्विटनं नेटकऱ्यांची झोप उडवली होती. त्यावर रणवीरनं प्रतिक्रिया दिली आहे. रणवीर म्हणतो 2012 मध्ये आमची भेट झाली होती. त्यानंतर आम्ही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. आमच्या नात्याला 10 वर्षे पूर्ण झाली. सोशल मीडियावर एका चाहत्याचे ट्विट व्हायरल झाले होते. त्यावरुन रणवीर आणि दीपिकाच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

हेही वाचा: Nikki Tamboli: निक्कीला पाहावं, शांत व्हावं!

संजय लीला भन्साळी यांच्या रामलीला पासून रणवीर आणि दीपिकाच्या लवस्टोरीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी बाजीराव मस्तानी, पद्ममावत आणि 83 चित्रपटामध्ये दिसले. त्यांच्या जोडीला चाहत्यांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री ही प्रेक्षकांना कमालीची भावली होती.

हेही वाचा: Radhika Apte: तो सीन करण्यापूर्वी ती नेहमीच अभिनेत्यासोबत...