रणवीर सिंहच्या मर्सिडीज कारला बाईकस्वाराने दिली धडक, रणवीरने गाडीतून उतरुन अशी दिली रिऍक्शन

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 16 October 2020

गुरुवारी एका बाईकस्वाराने रणवीरच्या मर्सिडीज कारला धडक दिली. त्यानंतर त्या बाईकस्वाराला आणि कारला लागलेली धडक पाहण्यासाठी तो स्वतः कारमधून उतरुन बाहेर आला.

मुंबई- बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह काहीना काही गोष्टींमुळे सतत चर्चेत असतो. मात्र आता तो चर्चेत आलाय एका व्हिडिओमुळे. रणवीरचा हा व्हिडिओ त्याच्या कारशी संबधित आहे. गुरुवारी एका बाईकस्वाराने रणवीरच्या मर्सिडीज कारला धडक दिली. त्यानंतर त्या बाईकस्वाराला आणि कारला लागलेली धडक पाहण्यासाठी तो स्वतः कारमधून उतरुन बाहेर आला. रणवीरचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच गाजतोय.

हे ही वाचा: सँडलवूड ड्रग्स केस: विवेक ऑबेरॉयची पत्नी प्रियांका अल्वाला पोलिसांनी पाठवली नोटीस  

अभिनेता रणवीर सिंह जेव्हा त्याचं डबिंगचं काम पूर्ण करुन त्याच्या मर्सिडीज कारमधून घरी जात होता तेव्हा ही घटना घडली. ट्रॅफिकमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या रणवीर सिंहच्या कारला मागून येणा-या बाईकस्वाराने धडक दिली. या घटनेचा पूर्ण व्हिडिओ विरल भयानीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये बाईकने धडक दिल्यानंतर कारला काही डॅमेज झालंय का हे पाहण्यासाठी रणवीर सिंह गाडीतून उतरुन पाहणी करत असल्याचं दिसून येतंय. जास्त नुकसान झालं नाही हे पाहून रणवीर गाडीत पुन्हा जाऊन बसतो. 

रणवीरच्या लूक नेहमीच चर्चेत असतो. यावेळीही तो ब्लॅक टी शर्ट वर ब्लॅक जॅकेटमध्ये दिसून आला. तसंच डोक्यावरही त्याने ब्लॅक कॅप घातली होती. यावर त्याने गुलाबी रंगाचे शूज घातले होते. सोशल मिडियावर हा व्हिडिओ चाहते मोठ्या प्रमाणावर व्हायरल करत आहेत. कारला धडक बसुनही रणवीरचा शांत स्वभाव चाहत्यांना जास्त भावतोय.   

ranveer singh mercedes car was damaged after bike brushes  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranveer singh mercedes car was damaged after bike brushes