रणवीर सिंग यापुढे करणार नाही कंडोमची जाहिरात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

कंडोमची जाहिरात रणवीर सिंग करणार नसल्याचे कळत आहे.

रणवीर सिंगचे नाव सध्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. तो सध्या बऱ्याच जाहिरातींमध्येही दिसत आहे. पण जाहिराती करताना काही नियम त्याने स्वतःला घालून दिले आहेत. कंडोमची जाहिरात रणवीर करणार नसल्याचे कळत आहे.

रणवीर सिंगने पाच वर्षांपूर्वी एका प्रसिध्द कंडोम ब्रँडसोबत करार केला होता. सुरक्षित लैंगिक संबंधांबाबत जनजागृती करण्यासाठी रणवीर या कंडोम ब्रँडची जाहिरात करत होता. 'ड्यूरेक्स' असे या ब्रँडचे नाव आहे. मात्र आता रणवीर सोबत असलेला हा करार आता मोडित निघाला आहे. 

रणवीर विवाहबंधनात अडकल्याने हा करार ड्यूरेक्सकडून तोडण्यात येत असल्याचे मिडीया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. पण रणवीरने मानधन वाढवून मागितल्याने हा करार रद्द होत असल्याच्याही चर्चा आहेत. रणवीर-दीपिकाचा विवाह 11 नोव्हेंबरला झाला. त्यावेळी 'ड्यूरेक्स'च्या ट्विटर हँडलवरुन दोघांनाही शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. 2014 ला दिलेल्या एका मुलाखतीत रणवीर म्हणाला होता की, 'मी नेहमीच कंडोम पाकिटात ठेवतो.' यावेळीच त्याने या उत्पादनाला प्रमोट करण्याविषयी बोलून दाखवले होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranveer singh not to endorse condoms ad 

टॅग्स