रणवीरचा पत्ता कोणी केला कट? आता किशोर कुमारच्या बायोपिकमध्ये असेल ...Kishore Kumar Biopic | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor

Kishore Kumar Biopic: रणवीरचा पत्ता कोणी केला कट? आता किशोर कुमारच्या बायोपिकमध्ये असेल ...

Kishore Kumar Biopic : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर हा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा नुकताच तु झुठी मैं मक्कार या चित्रपटात दिसला. या चित्रपटाल प्रेक्षकांचा समिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान आता रणबीरबद्दल आणखी एक बातमी समोर आली आहे.

त्याने यावर्षी स्पष्ट केलं की, तो गेल्या 11 वर्षांपासून किशोर कुमार यांच्या बायोपिकवर काम करत आहे. मात्र हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे सांगू शकत नाही.

रणबीर कपूरने अद्याप हा बायोपिक करण्यास नकार दिलेला नाही. मात्र आता बॉलिवूडच्या कॉरिडॉरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यानुसार या सिनेमातुन रणबीरचा पत्ता कट झाल्याचं सांगण्यात येत आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, किशोर कुमारच्या बायोपिकमध्ये आता रणबीर कपुर नसून रणवीर सिंग असेल. त्यामुळे अनेक नवीन चर्चांना उधाण आले आहे.

खरं तर, नुकतेच रणबीरने असं विधान केले आहे की त्याला चित्रपटांमधून ब्रेक घ्यायचा आहे आणि त्याच्या आयुष्यासाठी थोडा वेळ काढायचा आहे. त्याला त्याच्या आगामी 'अ‍ॅनिमल' चित्रपटानंतर ब्रेक घ्यायचा आहे.

रणबीर कपूर म्हणाला की त्याला स्वत:साठी वेळ द्यायचा आहे आणि महामारीनंतर तो आज कुठे उभा आहे आणि इंडस्ट्रीत किती बदलली आहे हे समजून घ्यायचं आहे.

रणबीर कपूरच्या या वक्तव्यानंतर किशोर कुमारच्या बायोपिकचे निर्माते कलाकारांमध्ये बदल करण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा आहे. ज्यामुळे असा अंदाज लावण्यात येत आहे की रणबीर या चित्रपटात दिसणार नाही, तर त्याजागी रणवीर सिंह दिसेल. परंतु आतापर्यंत याची पुष्टी करण्यात आलेली नाही.

मिडिया रिपोर्टनुसार, निर्माते या चित्रपटासाठी रणवीर सिंगला भेटण्याचा विचार करत आहेत. पण चित्रपट निर्माते अनुराग बसू अजूनही रणबीर कपूरसोबत पुन्हा काम करण्यास उत्सुक आहेत. प्रोजेक्टवर अंतिम कास्टिंग ऑगस्टनंतर केला जाईल, कारण किशोर कुमार बायोपिक 2023 च्या अखेरीस प्रदर्शित व्हावी अशी निर्मात्यांची इच्छा आहे.