Jogira Sara Ra Ra BO: जुगाडू जोगीराचं बॉक्स ऑफिसवर झालं आ.रा.रा..! पहिल्या दिवशी मारली फक्त इतकी मजल

Jogira Sara Ra Ra BO:
Jogira Sara Ra Ra BO:Esakal

Jogira Sara Ra Ra Box Office Collection Day 1: बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वास्तविक, त्याचा पत्नी आलियासोबत वाद सुरू आहे. आता या वादावर पडदा पडला असून नवाज पुन्हा त्याच्या कामात व्यस्त झाला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा जोगिरा सारा रा रा हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटात नवाजसोबत नेहा शर्मा देखील मुख्य भूमिकेत दिसत आहे.

चाहते नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पहात होते. नवाजसोबतच निर्मात्यांनादेखील या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या.

Jogira Sara Ra Ra BO:
Kiran Mane: ‘पाटलीण’ हायेस..रुबाबात नाच', आडनावावरच्या वादात किरण मानेंचा गौतमीला फुल सपोर्ट! टिका करणाऱ्यांची लाजच काढली

पण या चित्रपटाला लोकांचा मिळालेला प्रतिसाद आणि त्याला समिक्षकांच्या काही चांगल्या प्रतिक्रिया मिळालेल्या नाहीत. त्यातच आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. समोर आलेल्या आकडेवारीनुसार 'जोगिरा सारा रा रा' चे ओपनिंग डे कलेक्शन खूपच निराशाजनक आहे.

Jogira Sara Ra Ra BO:
Ananya Panday: 'अगं बाई किती ओव्हर अ‍ॅक्टिंग करशील', अनन्यांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल! नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 40 लाखांचा व्यवसाय केला. मात्र वीकेंडला हे कलेक्शन वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.मात्र जर त्यावेळी ही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या कमाईचे आकडे असेच असले तर हा चित्रपट त्याच्या बजेट इतकी कमाई देखील करु शकणार नाही.

चित्रपटाच्या आयएमडीबी रेटिंगबद्दल बोलायचं झालं तर, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नेहा शर्मा यांच्या रोमँटिक कॉमेडी 'जोगिरा सारा रा रा' ला 10 पैकी 7 रेटिंग देण्यात आली आहे. त्याचबरोबर चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशनही करण्यात आले होते. पण चित्रपटाचे कलेक्शन काही वेगळेच सांगत असल्याचं दिसतं.

Jogira Sara Ra Ra BO:
Salman Khan: 'माझ्याशी लग्न कर', भर कार्यक्रमात तिनं केलं प्रपोज! सलमान म्हणाला,..

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, 'जोगिरा सारा रा रा' ही लखनौस्थित जोगी म्हणजेच नवाजुद्दीन सिद्दिकीची कथा आहे. जो एका आलिशान इव्हेंट कंपनीचा मालक आहे. त्याच्या कंपनीत लोकांची लग्ने होतात आणि जोगी त्याच्या जुगाडसाठी देखील प्रसिद्ध आहेत.

तो डिंपलला (नेहा शर्मा) भेटतो जिला लग्न करायचं नाही. ती जोगीवर लग्न मोडण्याची जबाबदारी देते, ज्यात दोघेही अडकतात. चित्रपटाची कथा कशी वळण घेते हे चित्रपट पाहिल्यानंतर समजते, पण चित्रपट तुम्हाला खुप हसवतो. जोगिरा सारा रा रा या चित्रपट आता किती कोटींचा गल्ला जमवतो हे पहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com