
'जयेशभाई जोरदार' चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, पण.. घातली ही अट
Jayeshbhai Jordaar : रणवीर सिंगचा सिनेमा 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटातील या एका सीनवरून आक्षेप घेण्यात आला होता,ज्या सीनमध्ये गर्भलिंग निदान करणारी चाचणी दाखवण्यात आली होती. या सीनला ट्रेलर आणि सिनेमातून काढून टाकण्यासाठी प्रकाश पाठक नावाच्या वकीलांनी हाय कोर्टात(High Court) याचिका दाखल केली होती. तेव्हापासून सुरु असलेला न्यायालयीन तिढा आता सुटला आहे. न्यायालयाने चित्रपटाला परवानगी दिली असली तरी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
हेही वाचा: दिपाली सय्यदचा राज ठाकरेंना टोला, मोदींची मदत घ्यावी, म्हणजे..
मंगळवारी या चित्रपटाबाबत एक सुनावणी घेण्यात आली. यामध्ये न्यायमूर्ती नवीन चावला आणि न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी यांच्या खंडपीठाकडून चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट नियोजित वेळेत 13 मे रोजीच प्रदर्शित होणार आहे. जयेशभाई जोरदार या चित्रपटाविषयी जनहित याचिका दाखल केल्यानंतर या चित्रपटातील काही दृश्ये सुनावणीदरम्यान पाहिली गेली. त्यावेळी खंडपीठाकडून चित्रपटातील संदेशाचे कौतुक केले मात्र त्यावेळी हे ही सांगण्यात आले की, चित्रपटातील जो संदेश सांगायचा आहे तो कौतुकास्पदच आहे मात्र चित्रपटातून लोकांना सांगावे लागेल की, गर्भ लिंग निदान करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे चित्रपटात दोन वेळा हा गुन्हा असल्याबाबतचे डिस्क्लेमर दाखवावे लागेल असे खंडपीठाने म्हंटले आहे. (Ranveer Singh's Jayeshbhai Jordaar release cleared,but..)
हेही वाचा: 'आमने सामने' नाटकाची शंभरी.. लिव्ह इन रिलेशनशिप आणि लग्नसंस्कृतीवर..
चित्रपट कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करत नाही तसेच डिस्क्लेमर इंग्रजी तसेच हिंदीमध्ये ठळकपणे दाखवले जाईल असे ज्येष्ठ वकील जयंत मेहता यांनी चित्रपट निर्मात्यांच्या वतीने सांगितले. हा डिस्क्लेमर जोडण्यासाठी न्यायालयाने एका आठवड्याची मुदत दिली आहे.
जयेशभाई जोरदार हा दिव्यांग ठक्कर दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्स अंतर्गत आदित्य चोप्रा आणि मनीश शर्मा निर्मित आगामी कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत असून एका गुजराती सरपंचाचा मुलगा आहे. जो समाजात स्त्री-पुरुष समानतेवर विश्वास ठेवणारा आहे.
Web Title: Ranveer Singhs Jayeshbhai Jordaar Release Cleared Delhi Hc Orders New Disclaimers To Be Added
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..