रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'चा Trailer Out! पोस्टरवरचं 'ते' गुपित अखेर उलगडलं Ranveer Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranveer Singh says Jayeshbhai Jordaar will change the 'definition of heroism on screen'

रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'चा Trailer Out! पोस्टरवरचं 'ते' गुपित अखेर उलगडलं

बॉलीवूडमध्ये बाजीराव मस्तानी ,पद्मावत,राम लीला सारख्या सिनेमातील आपल्या अभिनयाच्या माध्यमातून रणवीरनं(Ranveer singh) आपल्या चाहत्यांचा मनावर नेहमीच चांगली छाप सोडलेली आहे. आपल्या प्रत्येक सिनेमांतून तो नेहमीच वेगळा अंदाज दाखवायचा प्रयत्न करतो. अर्थात प्रत्येक सिनेमातील त्याच्या लूकच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो पहिल्यापेक्षा नेहमीच वेगळा असतो. काही दिवसांपूर्वीच त्यानं कपिल देव यांच्यावर आधारित '83' सिनेमात मुख्य भूमिका केली होती. या सिनेमातील रणवीरच्या अभिनयाची प्रेक्षकांनी मनापासून प्रशंसा केली होती. त्याचा 'जयेशभाई जोरदार'(Jayeshbhai Jordaar) हा सिनेमा देखील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे,ज्यात रणवीरचा हटके अंदाज दिसत आहे. चला जाणून घेऊया 'जयेशभाई जोरदार' विषयी.

'जयेशभाई जोरदार' या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाल्यानंतर यातील रणवीर गुजराती मुलाची भूमिका साकारताना भलताच पसंत केला जात आहे. यातील त्याचं बोलणं,चालणं,राहणीमान सगळंच गुजराती ढंगात न्हाऊन निघालेलं दिसत आहे. नेहमीच्या रॉयल लूकमधून बाहेर निघत 'जयेशभाई जोरदार' सिनेमात साधा-सरळ गुजराती मुलगा रणवीरनं रंगवला आहे. हा सिनेमा प्रदर्शनासाठी आता सज्ज आहे. रणवीरनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'जयेशभाई जोरदार'चं नवं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये रणवीरच्या हातात जन्म नं झालेलं मुल दिसत आहे.

हेही वाचा: Lock Upp: जिशान खाननं आझमा फलाहला झाडूनं मारलं; कंगनानं घेतला मोठा निर्णय

'जयेशभाई जोरदार' सिनेमा हा यश राज बॅनरचा असून यात रणवीर सिंगसोबत अर्जुन रेड्डी फेम शालिनी पांडे दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शालिनी बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या सिनेमाला दिव्यांग ठक्करनं दिग्दर्शित केलं आहे. १३ मे,२०२२ रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून दिव्यांग ठक्करचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा असणार आहे.

Web Title: Ranveer Singhs Jayeshbhai Jordaar Trailer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..