Bigg Boss Marathi 4: दो हंसो का जोडा बिछड गयो रे.. रुचिरा जाधव घराबाहेर !

बिग बॉस मराठीच्या घरातील गोड कपल रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे यांना मोठा धक्का बसला.
ruchira jadhav eliminated from Bigg Boss Marathi 4
ruchira jadhav eliminated from Bigg Boss Marathi 4 sakal

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi)च्या चौथ्या पर्वातून काल रविवारी पाचवा सदस्य घराबाहेर पडला. गेली काही दिवस जिचा खेळ काहीसा डाउन झाला होता शिवाय आपले रिलेशन, टास्क आणि बिग बॉस मध्ये टिकण्यासाठी करावी लागणारी खेळी यामध्ये काहीशी कंफ्यूज असलेली अभिनेत्री रुचिरा जाधव अखेर घराबाहेर पडली. जोड्याने घरात वावरणाऱ्या रुचिरासाठी कालचा प्रसंग मोठा आघात करणारा होता.

(ruchira jadhav eliminated from Bigg Boss Marathi 4 )

ruchira jadhav eliminated from Bigg Boss Marathi 4
Onkar Bhojane: खळखळून हवसणाऱ्या ओंकार भोजनेवर सडकून टीका.. का होतोय ट्रॉल?

कालच्या भागात बिग बॉस मराठीची चावडी चांगलीच रंगली. शेतकरीच नवरा हवा मालिकेतील कलाकार रुचा गायकवाड, प्रदीप घुले आणि निर्माती श्वेता शिंदे बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना भेटले. तर सदस्यांसोबत रंगला एक गेम ज्यात गद्दार कोण ? हे सदस्यांना सांगायचे होते ज्यात रुचिराने अपूर्वाला तर विकासने किरण माने यांना गद्दार ठरवले. यावर किरण माने खूप दुखावले आणि त्याने स्वतःलाच गद्दार म्हणून टॅग दिला. तर यशश्रीने तेजस्विनीला ठरवले गद्दार. समृद्धीने अमृता धोंगडेला तर अक्षयने रोहितला गद्दार ठरवले. प्रसादने किरणला तर अमृता धोंगडेने प्रसादला गद्दार ठरवले. या टास्कमध्ये अनेकांची मने चांगलीच दुखावली.

ruchira jadhav eliminated from Bigg Boss Marathi 4
Shilpa Tulaskar: काही निर्माते चहा-कॉफीचेही हिशोब ठेवतात.. शिल्पा तुळसकरने केली पोलखोल

याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT चुगली बूथद्वारे आलेल्या चुगलीमुळे यशश्री अपूर्वा, अक्षय आणि अमृता देशमुखवर चांगलीच भडकली. ज्यामध्ये अमृता देशमुखचे म्हणणे होते त्यांनी यशश्रीला खूप आठवडे पोसलंय. यावर यशश्रीने तिचे स्पष्टीकरण त्यांना दिले. तर अपूर्वाने यशश्रीची कान उघडणी केली.

मग सगळ्यात कठीण क्षण आला. बिग बॉस च्या घरातून कधीच कुणी जाऊ नये हे घरातील प्रत्येक सदस्याला वाटत असते. पण प्रसाद आणि रुचिरा डेंजर झोनमध्ये आले. आणि रुचिरा जाधवला घर सोडून जावे लागले. रुचिरा आणि तिचा प्रियकर रोहित शिंदे यांनी एकत्र करत पाय ठेवला होता. या घरात रिलेशन टिकवण हेच त्यांच्यासाठी मोठा टास्क होता. ते दोघेही उत्तम खेळले. त्यांच्यात तंटे, वाद होऊनही एकत्र राहिले. काल रुचिरा बाहेर पडायच्या आधीच ते भांडले होते, त्यामुळे रुचिरा बाहेर पडताना रोहित धायमोकळून रडला. अत्यंत भावनिक असा हा क्षण होता. आता तिच्याविना रोहित कसा खेळतोय ते कळेलच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com