
प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहला ट्राफिक पोलिसांनी मोठा दणका दिला. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानं बादशाहला १५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. राँग साईडने गाडी चालवणं बादशाहला महागात पडलं. रविवारी बादशाह त्याच्या तीन कार घेऊन करण औजलाच्या कॉन्सर्टला पोहोचला होता. गुरुग्राम सेक्टर ६८ मध्ये झालेल्या कॉन्सर्टवेळी त्याची गाडी राँग साईडने पळवण्यात आली. यामुळे ट्राफिक पोलिसांनी त्याची पावती फाडली.